Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

उच्चशिक्षित आरोपीकडून २.४६,००,०००/- लाख रुपयाची आर्थिक फसवणुक, पुणे सायबर पोलीसांची हैद्राबाद येथे कारवाई.

आय.आय.टी. मुंबई येथील प्रकल्प देण्याच्या बहाण्याने पुण्यातील एका शिक्षण संस्थेची २.४६,००,०००/- रुपयांची अर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीस हैद्राबाद येथून केले जेरबंद

0 6 8 8 3 0

पुणे : Bombay IIT येथील एका प्रतिष्ठीत प्राध्यापकाचे नाव वापरुन शासनाचे Al व Drone प्रकल्प देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना मेल व व्हॉट्सॲप कॉलव्दारे त्यांची दिशाभूल करुन त्यांना पैसे भरण्यास भाग पाडले,

पुण्यातील नामांकीत इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या फिर्यादी यांची एकूण २,४६,००,०००/- रुपयाची आर्थिक फसवणुक केली म्हणून हा गुन्हा दिनांक ०६/०९/२०२५ रोजी सायबर पोलीस ठाणे,पुणे शहर येथे दाखल करण्यात आला होता.

या दाखल गुन्ह्याच्या तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी सखोल तपास केला व गुन्ह्यातील मिळून आलेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे फिर्यादी यांच्या विद्यापीठाची एकूण २,४६,००,०००/- रू रकमेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव हे Bombay IIT येथील प्राध्यापकाचे नसून ते सितैया किलारु, वय ३४ वर्षे, रा. मेहेर रोड, याप्रल, हैद्राबाद तेलंगणा (Seetaiah Kilaru, Address Meherr Road, yepral, Hydrabad Telangana) असे असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

त्यानंतर तपासात निष्पन्न झालेल्या आरोपीस ताब्यात घेण्यासाठी दि. १८/०९/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे व सायबर पोलीस पथक हैद्राबाद येथे रवाना झाले. हैद्राबाद येथे दि.२१/०९/२०२५ रोजी आरोपीचा शोध घेण्याकरीता साई नगर, प्रगती नगर, निजामपेठ, गच्चीबावली, याप्रल याठिकाणी कसोशीने शोध घेतला असता, तो याप्रल, हैद्राबाद येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर सापळा रचून त्यास शिताफिने पकडून ताब्यात घेण्यात आले. 

त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता तो स्वतः गुन्ह्याचा Mastermind असल्याचे खात्री पटल्याने त्यास अटक केली.या आरोपीकडून १० डेबीटकार्ड, १३ पासबुक, १५ चेकबुक, एक ०५ जी सीमकार्ड, सोने खरेदी पावत्या, इतर कागदपत्रे, ७० हजार रुपये किमतीचे ४ मोबाईल, एक टेब,एक लॅपटॉप, १,०५,०००/- रूपये किमतीचे दागिने, तसेच ४० लाख रुपये किमतीची एक टोयोटा इनोव्हा कार व ८ लाख रुपये किमतीची एक किया सोनेट कार असा मुद्देमाल,एकूण ४९ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीचा हैद्राबाद न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड घेऊन त्यास पुणे येथे आणण्यात आले असून मा. न्यायालयाने आरोपीची दि. २८/०९/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री अमितेशकुमार,पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा,अपर पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री पंकज देशमुख (गुन्हे) पोलीस उप-आयुक्त आर्थिक व सायबर पुणे शहर,श्री विवेक मासाळ,पोलीस उप-आयुक्त (पोलीस मुख्यालय),श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर,सहा. पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर पुणे श्री. मच्छिंद्र खाडे, यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे पुणे शहराच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक,श्रीमती संगिता देवकाते, पोलीस अंमलदार संदिप मुंढे, बाळासो चव्हाण, नवनाथ कोंडे, संदिप कारकूड,पोलीस अंमलदार अमोल कदम, सचिन शिंदे, गंगाधर काळे,अदनान शेख, सतिश मांढरे,कृष्णा मारकड महिला पोलिस अंमलदार,टिना कांबळे,सुप्रिया होळकर या पथकाने सदरची कामगिरी केली आहे.

सदर आरोपी हा सराईत आरोपी असुन त्याचेवर सायबर पोलीस ठाणे हैद्राबाद तसेच सायबर क्राईम पोलीस ठाणे तेलंगणा,नचीबोवली पोलीस ठाणे तेलंगणा,मेडीचेली पोलीस ठाणे तेलंगणा येथे जवळपास आठ गुन्हे दाखल आहेत.

आरोपीची माहिती पुढील प्रमाणे

आरोपी मुळचा विजयवाडा मधील असून सध्या हैद्राबाद येथे वास्तव्याला आहे.आरोपी हा उच्च शिक्षित असून २०१० मध्ये ई. एन. टी. सी. इंजिनियर सन २०१० ते. सन २०१४ मध्ये स्टॅफोर्डशाईर युनिर्व्हसिटी, लंडन, मु.के. येथे ई.एन.टी.सी मध्ये मास्टर डिग्री तसेच ब्रिमिगहम युनिर्व्हसिटी, लंडन, यु.के येथे ई.एन.टी.सी मध्ये पी.एच.डी. केली आहे.सन २०१५ ते सन २०१६, कोनेरु युनिर्व्हसिटी हैद्राबाद येथे नोकरी केली.सन २०१६ ते सन २०१८ बी. आर. आय. टी. युनिर्व्हसिटी हैद्राबाद येथे नोकरी केली. ६) सन २००१९ व सन २०२० मध्ये यु.पी.एस.सी. पूर्व व मुख्य परिक्षा पास.सन २०२१ मध्ये ऑनलाईन टिचींग यु.पी.एस. सी. प्रिप्रेशन बाबत.सन २०२२ पासून कौटुंबिक वाद झाल्यावर कुठेही जॉब करीत नाही.

पुणे सायबर पोलीसांचे जनतेस आवाहन 

शेअर ट्रेडिंग मध्ये जास्त परताव्याचे आमिष, अटकेची भिती, पार्सल मध्ये ड्रग्ज, इलेक्ट्रीसीटी गॅस कनेक्शन बंद होईल,ऑनलाईन बैंक केवायसी अपडेट अशी प्रलोभने व धमक्या प्राप्त झाल्यास त्या व्यक्तीबाबत एन. सी. आर. पी. पोर्टल https://cybercrime.gov.in,वर तसेच 1930,1945 यावर संपर्क साधून नजिकच्या पोलीस ठाण्यात/सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा जेणेकरुन आपली फसवणूक टाळता येईल तसेच एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या बैंक खात्यावर मोठी रक्कम ट्रान्सफर करताना बँकेचे खाते क्रमांक,धारकाचे नाव,बैंक शाखेचे नाव इ. बाबत खात्री करावी व नंतरच व्यवहार करावा असे आवाहन करीत आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे