Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

बारामती कॅटल फीड प्रायव्हेट लिमिटेड कडून स्वातंत्र्य विद्या मंदिर प्रशालेत वह्या वाटप

0 6 1 1 8 9

बारामती : वडगाव निंबाळकर येथील कॅटल फीडचे वितरक ‘सूर्यकांत ट्रेडर्स’चे श्री शशिकांत शहा व प्रशांत शहा यांच्या प्रयत्नातून बारामती कॅटल फीड प्रायव्हेट लिमिटेड,बारामती,पुणे यांच्या वतीने CORPARATE SOCIAL RESPONSIBILITY (CSR FUND) या योजनेत वडगांव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्या मंदिर शाळेचा समावेश केला व या योजनेतून प्रशालेतील इयत्ता 5 वी ते 12 वी या वर्गातील एकूण 490 विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा वह्या अशा एकूण 2420 इतक्या वाह्याचे वाटप करण्यात आल्या. तसेच मुलींसाठी एकूण 285 सॅनिटरी पॅड (Sanitary Pad) असे एकूण 1,10,000 रुपये किंमतीचे वाटप करण्यात आले.

बारामती कॅटल फीड प्रायव्हेट लिमिटेड,बारामती यांचे प्रतिनिधी श्री.मच्छिंद्र मिसाळ,मार्केटिंग अधिकारी तसेच श्री,अभिजीत अवघडे,विक्री अधिकारी यांनी प्रशालेस भेट दिली व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सुशीलकुमार अडागळे व प्रशालेचे प्राचार्य श्री.हेमंत तांबे सर यांच्यासह प्रशालेचे सर्व शिक्षक,शिक्षिका,आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप व सॅनिटरी पॅड वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच तसेच प्रशालेचे प्राचार्य श्री तांबे सर यांनी कंपनीच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल जनता शिक्षण संस्था, पुणे चे अध्यक्ष सर्व संचालक मंडळ तसेच प्रशालेचे प्राचार्य, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने आभार व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे