गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करीत शरीरसुखाची मागणी, – वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल.

0
5
5
5
3
9
बारामती : तालुक्यातील करंजेपूल,सोमेश्वरनगर हे एक विविध शैक्षणिक संस्थांच्या शाळा व महाविद्यालयांसाठी विद्यार्थ्यांमध्ये परिसरातील जवळचे ठिकाण म्हणून शैक्षणिकदृष्ट्या पसंतीचे शैक्षणिक संकुल ठरत आहे.तसेच याठिकाणी राज्याच्या विविध जिल्ह्यातूनही विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत.
याच परिसरातील एका महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थीनीशी मैत्री करीत व नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील व्हिडिओ तयार करून व ते समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकी देत शरीर सुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.
याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि घटना दि.१६ जानेवारी ते २९ जून २०२५ या दरम्यान घडली आहे.याप्रकरणी पार्थ शिंदे रा.किल्लज,ता.तुळजापूर, यांच्यासह रोहन चाबुकस्वार,रा.करंजेपुल,ता.बारामती, सूरज दत्तात्रय भोसले,हनुमंत शिंदे, विजय मोजगे,तुषार जगदाळे अशा सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विद्यार्थीनीच्या मैत्रिणीने पार्थ शिंदे याच्याशी डिसेंबर २०२४ मध्ये ओळख करून दिली होती.याच ओळखीतून पार्थ हा फिर्यादी विद्यार्थीनीला नेहमी फोन करत असे. या ओळखीतून त्यांची चांगली मैत्री झाली.

दरम्यान दिनांक १३ जानेवारी रोजी पार्थ शिंदे याने पिडीत विद्यार्थिनीला नीरा ता.पुरंदर येथील कॅफे मध्ये भेटून तिच्यासोबत फोटो काढले होते.
त्यानंतर दि.१६ जानेवारी रोजी पीडिता विद्यार्थिनी महाविद्यालयात असताना पार्थने ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे’असे सांगत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. यासाठी पीडितेने नकार दिला, परंतु त्यानंतर त्याने तिचा सतत पाठलाग सुरू केला.
याचदरम्यान करंजेपूल येथील एका कॅफे मध्ये भेट झाल्यावर तिच्या नकळत मोबाईलवर व्हिडिओ काढला होता. त्यानंतर पार्थ शिंदे याने पीडितेला WhatsApp मेसेजेस व कॉल करून व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करीत एके दिवशी तीला तिचे कपडे काढण्यास भाग पाडत तिचा नग्न व्हिडिओ तयार केला. व तू माझ्याशी संबंध ठेवले नाहीस तर मी हे व्हिडिओ मी तुझ्या कुटुंबीयांना पाठवेन व तुझी बदनामी करेन असे सांगत तिला वेळोवेळी धमकावल्याचे पिडीतेने आपल्या फिर्यादित म्हटले आहे.
पुढील अधिकचा तपास बारामती विभागाचे विभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड हे करीत आहेत.





