अपघातब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामती वाहतूक शाखा,पुणे ग्रामीणच्या वतीने जारी केलेल्या जाहीरनाम्यानुसार, बारामती शहरात अवजड वाहतुक नियमन करण्याबाबत… दि.१९/०८/२०२५ पासून आदेश निर्गमित,
बारामती वाहतूक शाखा,पुणे ग्रामीणच्या वतीने जारी केलेल्या जाहीरनाम्यानुसार, बारामती शहरात वाहतूक नियमनासंदर्भात महत्वाचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

0
5
4
4
2
8
दिनांक २७/०७/२०२५ रोजी बारामती शहरातील महात्मा फुले चौक, खंडोबानगर येथे झालेल्या अपघातानंतर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते.
अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदीची मागणी :
ट्रक, हायवा, टिपर, डंपर यांसारख्या अवजड वाहनांना शहरातून जाण्यास बंदी घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वाहतूक नियमनाचे आदेश :
बारामती शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी, वेग मर्यादा पाळणे, वाहतूक नियमांचे पालन करणे आणि वाहतूक शाखेच्या आदेशाचे पालन करणे यासारखे उपाय सुचवले आहेत.
नागरिकांच्या मागणीवर आधारित :
हे नियम नागरिकांच्या मागणीनुसार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकांमधील निर्णयांवर आधारित आहेत.
बारामती : बारामती शहरामध्ये दिनांक २७/०७/२०२५ रोजी महात्मा फुले चौक, खंडोबानगर, बारामती. याठिकाणी खडी वाहतुक करणा-या टाटा कंपनीचा हायवा गाडी वाहनाने एका मोटार सायकलला धडक दिल्याने चालक व त्याचे सोबत असलेल्या दोन लहान मुली यांचा मृत्यु झालेल्या अपघाताच्या अनुषंगाने नागरिकांचे जीवितास धोका होऊ नये तसेच नागरिकांच्या मागणीनुसार व प्रशासकीय अधिकारी यांचे बैठकीमधील ठरलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने.
ट्रक, हायवा, टिपर, डंपर, अशी अवजड वाहने शहरांमधून जाऊ नये अशा मागणीची निवेदने बारामती शहरातील नागरिकांनी दिलेली होती,
यापूर्वी बारामती शहरांमध्ये ट्रक, हायवा, टिपर, डंपर, अशा वाहनांनी प्राणघातक अपघात झालेले आहेत हे लक्षात घेऊन
दि.१२/०८/२०२५ रोजी मा. उप विभागीय अधिकारी, बारामती यांच्या दालनात तसेच दि.१४/०८/२०२५ रोजी मा.अपर पोलीस अधिक्षक बारामती यांच्या दालनात वाहतुक नियोजनाचे अनुषंगाने बैठक झाली. बैठकी वेळी बारामती मधील नागरिक, पत्रकार, अपघात मुक्त बारामती ग्रुपचे प्रतिनिधी, हायवा मालवाहतुकदार, संघटनेचे पदाधिकारी सदस्य, केडाई चे पदाधिकारी तसेच मा. उप विभागीय अधिकारी, बारामती, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग,उप विभागीय अधिकारी, बारामती विभाग बारामती, उपप्रदेशिक परिवहन अधिकारी, बारामती विभाग बारामती, मुख्य अधिकारी बारामती नगरपरिषद बारामती, गट विकास अधिकारी, बारामती, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग बारामती, पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक बारामती वाहतुक शाखा तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकी दरम्यान चर्चे अंती शहरात सकाळी ०७:०० वा, ते दुपारी १२:०० वा,आणी दुपारी १६:०० ते रात्री २१:०० वाजेपर्यंत खडी, क्रश,वाळू, माती, मुरूम यांची वाहतूक करणारे ४ ब्रास किंवा त्यापेक्षा जास्त क्षमता असलेले ट्रक, हायवा, टिपर, डंपर अशी अवजड वाहने यांना बारामती शहर हददीतील महत्वाचे चौक ज्यामध्ये सम्यक चौक, महात्मा फुले चौक, खंडोबानगर चौक, सातव, गुणवडी चौक, गांधी चौक, फलटण चौक, वाबळे हॉस्पीटल चौक, शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, बस स्टैंड, मोतीबाग चौक, कोर्ट कॉर्नर, सिटी ईन चौक, पेन्सिल चौक इत्यादी महत्वाच्या चौकामधुन व परिसरात सोमवार ते शनिवार सकाळी ०७:०० वाजता ते दुपारी १२:०० वाजता आणी दुपारी १६:०० ते रात्री २१:०० वाजेपर्यंत बंदी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
बारामती शहरात झालेल्या अपघातातील वाहनांचा वेग हा जास्त असल्याने अपघात होऊन नागरिकांचे जीवितास धोका उत्पन्न होत आहे. यासाठी वाहनांचा वेग कमी असावा याबाबत नागरिकांची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे.गर्दीच्या वेळी अशा प्रकारची वाहतूक बारामती शहरांमध्ये चालू ठेवल्यास बारामती शहरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल,वाहतुकीस अडथळा होईल,यासाठी






