गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल, माळेगांव पोलीस ठाणे हद्दीत कारवाई.

0
5
8
4
6
6
बारामती: दि.04/08/2025 रोजी सकाळी 09/00 वा चे सुमारास पाहुणेवाडी ता. बारामती जि.पुणे गावच्या हद्दीत जय मल्हार किराणा दुकानाजवळ एक इसम ज्याचे नांव महेश दत्तात्रय मदने वय 30 वर्षे रा.मळद ता. बारामती जि. पुणे हा त्याच्या स्कुटी मोटारसायकल वरून महाराष्ट्र राज्य शासनाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करून रू.13,545/- किंमतीचा गुटखा विक्री करीता घेवुन जात असताना मोटारसायकल सह मिळुन आला.
सदर गुन्ह्याच्या प्रकरणात श्री.ज्ञानेश्वर शंकर मोरे नेमणुक माळेगाव पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीनुसार महेश दत्तात्रय मदने वय 30 वर्षे रा. मळद ता. बारामती जि. पुणे यांचेविरूध्द भारतीय न्याय संहिता सन 2023 च्या आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हाचा पुढील तपास चालू आहे असे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.
हि कारवाई सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय,बारामती विभाग व माळेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आली.




