Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

ऑनलाइन जुगार चालवणाऱ्या चौघांवर कारवाई, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

0 6 8 8 3 4

बारामती : वडगांव निंबाळकर पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुर्टी,या.बारामती येथे मरीमाता कलेक्शन जवळ www.funrep.pro या लिंक वरून मोबाईल मध्ये आयडी व पासवर्ड पाठवून ऑनलाइन जुगार चालवणारे चार इसम त्यांची नावे १) संतोष रामदास रासकर रा.करंजे,रासकर मळा तालुका बारामती 2) महेंद्र रामचंद्र मोरे राहणार मुर्टी,तालुका बारामती यांना त्यांच्याकडे असलेल्या मोबाईल सहित ताब्यात घेऊन चौकशी केली असता funrep या ॲप वरून ऑनलाईन जुगार चालवत असल्याचे निष्पन्न झाले.

याबाबत त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी सदरचा ऑनलाइन जुगार हा रोहित पवार पूर्ण नाव माहित नाही राहणार वाणेवाडी तालुका बारामती व विक्रम जाधव पूर्ण नाव माहित नाही रा.मोढवे तालुका बारामती यांच्या मदतीने चालवत असल्याचे समोर आले.

या कारवाईमध्ये एकूण 17850/ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

कारवाई नंतर वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही श्री.संदीपसिंह गिल्ल,पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण,श्री.गणेश बिरादार,अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग,श्री.डॉ.सुदर्शन राठोड,उपविभागीय पोलीस अधिकारी,बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी,सहायक पोलीस निरीक्षक,श्री नागनाथ पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक,डी.एस.वारुळे,पोलीस हवालदार श्री.अमोल भोसले व श्री.एस.पी.देशमाने यांनी मिळून केली.

गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस हवालदार अमोल भोसले हे करीत आहेत.

1/5 - (1 vote)

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे