Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसोशल मिडिया

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार, वडगांव निंबाळकर येथे एकावर गुन्हा दाखल 

0 5 5 5 3 7

बारामती : फलटण जिल्हा सातारा येथील युवकाने बारामती तालुक्यातील एका युवतीचे २०१९ पासून जबरदस्तीने प्रस्थापित केलेल्या शरीरसंबंधाचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फलटण येथील गौरव आदेश निंबाळकर रा. फलटण, जि. सातारा वय २४ वर्ष या तरुणावर वडगाव निंबाळकर पोलिसात बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०१९ ते मे २०२५ या कालावधीत आरोपीने फलटण येथील आरोपीच्या घरा जवळ तसेच फलटण येथील लॉजमध्ये तसेच करंजेपुल ता. बारामती येथे आरोपीने पीडितेवर वारंवार अत्याचार केले.

पीडिता नोव्हेंबर २०१९ मध्ये फलटण येथे इयत्ता १० वी मध्ये शिकत असताना तिची आरोपीशी ओळख झाली. सुरुवातीला त्यांने पीडितेशी ओळख वाढवून तिच्याशी बोलत होता. मात्र २०२० मध्ये आरोपीने पीडितेला शरीसुखाची मागणी केली, त्यास तिने नकार दिला. त्यानंतर मात्र आरोपीने शिवीगाळ व त्रास देणे सुरू केले. “मी तुझ्या घरच्यांना तुझ्याबाबत सांगेन, तुझी बदनामी करेन” अशा धमक्या देत राहिल्याने पीडितेने आरोपीशी फोनवर बोलणे बंद केले.

दरम्यान पीडिता घरी एकटी असताना आरोपीने घरात घुसून “तु माझ्याशी फोनवर बोल नाहीतर तुझ्या घरच्यांना आपले लफडे आहे असे सांगेन” अशी धमकी दिली. व नंतर काही दिवसांनी आरोपीने पीडितेला फोन करून बोलावले,व मोटारसायकलवर बसवून फलटण येथील लॉजवर नेले आणि तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध केले.

त्यावेळी आरोपीने पीडितेचे मोबाईलमध्ये उघडे फोटो, तसेच दोघांचे उघडे फोटो आणि व्हिडिओ काढले. “हा प्रकार घरी सांगितलास तर हे फोटो-व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करीन” अशी धमकी देऊन वारंवार ब्लॅकमेल करत फेब्रुवारी २०२४ पर्यंत वेळोवेळी पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक असंबंध ठेवले.

यानंतर ७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी आरोपी करंजेपुल येथे पीडितेच्या घरी आला. “माझ्यासोबत लॉजवर चल नाहीतर मोबाईलमधील तुझे उघडे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करीन” अशी धमकी देऊन तीला मारहाण केली आणि “तुला सुखाने जगू देणार नाही” असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली.

सदर प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसात आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे