अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी
वडगाव निंबाळकरच्या ‘शिवांजली’ची BSF मध्ये गरुडझेप; संघर्षातून यशाचे शिखर; लेकीच्या यशाने बापाचा ऊर भरून आला!
पोलीस भरतीतील अपयशाने खचली नाही; जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर सामान्य कष्टकऱ्याच्या मुलीने गाठले यशाचे शिखर.

0
5
5
5
4
0
वडगाव निंबाळकर : परिस्थितीवर मात करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शिवांजलीने ‘सीमा सुरक्षा बल’ (BSF) मध्ये भरती होत यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे केवळ तिच्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण गावाची मान अभिमानाने उंचावली आहे. या यशाचा आनंद साजरा करताना तिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले, हा प्रसंग मनाला स्पर्श करून गेला.
शिवांजली चा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या शिवांजलीने शिक्षणाचे महत्त्व ओळखून लहानपणापासूनच अभ्यासात सातत्य ठेवले. घरची परिस्थिती बेताची असतानाही तिने हार मानली नाही. अभ्यासासाठी आवश्यक साधनांची कमतरता असतानाही, तिने केवळ आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले. दिवसाचे अनेक तास अभ्यास करून आणि संयम ठेवून तिने हे यश मिळवले आहे. तिच्या या प्रवासात तिला तिच्या आई-वडिलांनी खंबीर साथ दिली.
परिस्थितीवर मात करत, अपयशाला न घाबरता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वडगाव निंबाळकर येथील शिवांजली शंकर चव्हाण हिने एसएससी जीडी (SSC GD) परीक्षेत घवघवीत यश संपादन करत ‘सीमा सुरक्षा बल’ (BSF) मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. ती सध्या एस.वाय.बी.ए. (SYBA) मध्ये शिक्षण घेत असतानाच तिने हे यश मिळवून केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण गावाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. या यशाचा आनंद साजरा करताना तिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले, हा प्रसंग खरंतर प्रत्येकाच्याच मनाला स्पर्श करून गेला.
शाळेच्या मैदानापासून सीमेपर्यंतचा शिवांजलीचा प्रवास एक संघर्षगाथा

शिवांजलीचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या शिवांजलीचे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण अतिशय दुर्गम अशा डोंगरी भागात दत्तनगर वेनवडी (ता. भोर) येथे झाले. पुढील शिक्षण (५वी ते १०वी) तिने वडगाव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्या मंदिरात पूर्ण केले. सध्या ती मु. सा. काकडे महाविद्यालयात SYBA च्या वर्षात शिकत आहे. तिला लहानपणापासूनच पोलीस दलात जाण्याचे स्वप्न होते आणि खेळाचीही विशेष आवड होती.
शिवांजलीने २०२४ मध्ये पोलीस भरतीसाठी प्रयत्न केला होता. मात्र, केवळ स्व-अभ्यास (Self-study) करत असल्याने तिला त्यावेळी यश आले नाही. पण या अपयशाने ती खचून गेली नाही. तिने जिद्दीने करिअर अकॅडमीत प्रवेश घेतला आणि तिथेच तिच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.






