ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
आगामी काळातील धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर वडगांव निंबाळकर पोलिसांकडून बैठिकचे आयोजन

0
6
5
0
9
5
बारामती: आगामी गणेशोत्सव तसेच दहीहंडी उत्सव या सणांच्या पार्श्वभूमीवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे येथे शनिवार दिनांक ०९/०८/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री.सचिन काळे यांच्या नियोजनाखाली सुचना व मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

गणेशोत्सव व दहीहंडी उत्सव 2025 च्या अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील गावागावातील गणपती मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच पदाधिकारी,या बैठकीसाठी उपस्थित होते, उपस्थित मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष,पदाधिकारी यांना आगामी उत्सवाच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना देण्यात आल्या,तसेच सर्व मंडळ अध्यक्ष यांनी उत्सव साजरा करण्याबाबत ऑनलाईन परवानगी घेणे, मिरवणुकी दरम्यान पारंपरिक वाद्य वाजवावीत,ध्वनीप्रदूषण होणार नाही या करीता नियम व अटींचे पालन करावे.वादग्रस्त देखावे, स्टेटस बॅनर लावू नये,तसेच सामाजिक/जातीय सलोखा जपावा. अशा विविध मार्गदर्शक सूचना या वेळी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सचिन काळे यांनी दिल्या आहेत.

याचबरोबर उत्सव साजरे करत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येकाने सजग व जागरूक रहावे तसेच उत्सवांच्या काळात कोणतीही मदत भासल्यास पोलींसांशी संपर्क साधावा असेही आवाहन वडगांव निंबाळकर पोलीसांच्यावतीने करण्यात आले.





