Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथे स्वतंत्र पोलीस ठाणे झाले कार्यान्वित; सहायक पोलीस निरीक्षक गजानन चेके यांनी स्वीकारला पदभार

0 7 9 4 3 4

​नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर): इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याचे काम अधिकृतरीत्या सुरू झाले असून, या पोलीस ठाण्याचे पहिले प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून गजानन चेके यांनी पदभार स्वीकारला आहे.

​राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विशेष प्रयत्नातून नीरा नरसिंहपूर येथे हे नवीन पोलीस ठाणे कार्यान्वित झाले आहे. या पोलीस ठाण्याचे कामकाज सुरू होताच, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी नवनिर्वाचित प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन चेके यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.

​पोलीस ठाण्यात खालील कर्मचाऱ्यांची नियुक्ती

नवीन पोलीस ठाण्याच्या कामकाजासाठी पोलीस पथकाचीही घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सहाय्यक फौजदार प्रकाश माने, सहाय्यक फौजदार भरत जाधव, पोलीस हवालदार जगन्नाथ कळसाईत, किरण चंदनशिवे, महेश गोसावी, महिला पोलीस कॉन्स्टेबल रेश्मा जगताप, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत सलगर, आरिफ सय्यद, शनिदेव कांबळे आणि समाधान अहिवळे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

यावेळी ​ग्रामस्थांकडून आणि देवस्थान ट्रस्टकडून सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

पोलीस ठाणे सुरू झाल्याबद्दल आणि अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबद्दल नीरा नरसिंहपूरच्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त अभय वांकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन चेके व इतर कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला.

​याप्रसंगी नितीन सरवदे, अण्णा काळे, माजी उपसरपंच नरहरी काळे, जगदीश सुतार, तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ राऊत, उपसरपंच गुरुदत्त गोसावी, संतोष मोरे, आनंद काकडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे