Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमीसामाजिक

मुस्लिम समाजातर्फे वडगांव निंबाळकर येथे वारकऱ्यांना अल्पोपहाराचे नियोजन 

0 6 0 7 5 2

बारामती: संत श्रेष्ठ सोपानकाका महाराज पालखीचे व वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी वडगांव निंबाळकर येथे 

मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागतकक्ष उभारण्यात आला होता.पालखी आगमनानंतर मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने संत सोपानकाका महाराज पालखीचे स्वागत करण्यात आले तसेच पालखी सोबतच्या वारकऱ्यांना पोहे, जिलेबी व चहा अशा अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

 

स्वागतकक्षावर संतश्रेष्ठ श्री सोपान काका महाराज पालखीचे विश्वस्त ॲड.त्रिगुण गोसावी यांनी भेट दिली, यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

विश्वस्त गोसावी यांनी मुस्लिम समाजबांधवांशी बोलताना  सांगितले आपण अशाचप्रकारे कार्य करीत रहा माऊली आपल्या पाठीशी आहेत. 

याप्रसंगी वडगाव निंबाळकरचे प्रथम नागरिक सरपंच श्री.सुनिल ढोले यांच्यासोबत प्रकाश नाना जाधव व मुस्लिम समाजाचे अध्यक्ष असिफ शेख, उपाध्यक्ष,जहांगीर शेख,सचिव,इकबाल शेख,

खजिनदार,रिजवान पठाण,स्पर्धा परीक्षा युवा मंचचे संस्थापक शेख सर,टिपू भालदार,फिरोज भालदार, सलमान आत्तार,जावेद बागवान,इकबाल आत्तार ,शहीद बागवान,फरदीन बागवान,इरफान बागवान,सोहेल भालदार,चांद बागवान,साद बागवान यांच्यासह वडगाव निंबाळकर येथील बहुसंख्य समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे