Breaking
अपघातब्रेकिंगमहाराष्ट्र

वडगांव निंबाळकर पोलीस ठाणे अंकित,करंजेपूल पोलीस दूरक्षेत्र येथे दुचाकी चालकावर कारवाई, 24 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

0 5 8 4 3 2

बारामती : वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत करंजेपुल पोलीस दूरक्षेत्र परीसरात तुषार विकास गायकवाड रा.चोपडज ता‌.बारामती जिल्हा,पुणे हा त्यांच्या ताब्यात असणारी यामाहा कंपनीची मोटारसायकल वेगात चालवत असताना सोमेश्वर चौकात पोलीसांना मिळुन आला करंजेपूल पोलीसांनी या यामाहा मोटारसायकल ची पाहणी केली असता मोटरसायकलच्या पुढील बाजूस समोरून येणाऱ्या वाहनांना तसेच लोकांच्या डोळ्याला त्रास होईल अशा चायनीज एल ई डी लाईट बसवल्याचे आढळून आले,या एल ई डी लाईटच्या वापरास बंदी असुन अशा लाईट लावल्यानंतर समोरून येणाऱ्या वाहन चालकांना रस्ता दिसत नाही व त्यामुळे अपघाताची शक्यता असते, पोलीसांनी तुषार गायकवाड यांच्या मोटारसायकलवर कायदेशीर कारवाई केली असुन त्यांची मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.

 

या मोटारसायकल मालकास आर टि ओ विभागाने पोलीसांच्या रिपोर्ट वरुन २४०००/- रु दंड केला असुन मोटारसायकल मालकास हा दंड भरुन मोटारसायकल घेऊन जाण्याचे आदेश दिले आहेत,

तसेच या पुढे अशा प्रकारे नियम धाब्यावर बसवून मोटारसायकल चालवल्यास अशाच प्रकारे दंडात्मक कारवाई केली जाईल.अशी माहिती करंजेपूल दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक श्री.राहुल साबळे यांनी दिली.

सोमेश्वरनगर हे शिक्षणासाठी तसेच साखर कारखाना व परीसरातील महत्वाची बाजारपेठ म्हणून गजबजलेले गांव आहे त्यामुळे या परिसरात मोटरसायकल चालकांवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

या कारवाईमुळे आरटीओ नियमाच्या विरोधात जे दुचाकी चालक गाड्या चालवत आहेत त्यांना एक प्रकारे चांगलीच जरब बसेल.असा पोलिसांप्रती विश्वास नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

या घटनेमुळे वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे,करंजेपूल पोलीस दूर क्षेत्र यांच्या प्रमाणिक कामाचे लोकांमध्ये कौतुक होत आहे.

पोलीस आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व चांगल्या प्रकारे करत आहेत अशी परिसरामध्ये चर्चा असून, गोरगरीब लोकांना पोलिसांकडून न्याय मिळत आहे,तक्रारदार थेट पोलिसांशी संपर्क साधत आहेत तसेच पोलिसांकडे मध्यस्थी करणाऱ्यांना पोलीस चौकीत येण्यास मज्जाव करण्यात येत आहे, 

सामान्य नागरिकांना पोलीस आपलेच बांधव आहेत व या ठिकाणी आपल्याला न्याय मिळू शकतो अशी भावना व्यक्त करीत आहेत,

करंजेपूल पोलीस दुरक्षेत्र तसेच वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे येथील गुन्हेगार यांना कायद्याचा जरब बसला असून त्यांनी गुन्ह्यापासून दूर राहण्याचे ठरवले आहे असे एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे. पोलिसांचा गुन्हे आणि गुन्हेगार यांच्यावर वचक दिसून येते असल्याचे सामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे.

यामुळेच अनेक तक्रारदार निर्भयपणे तक्रार देण्यासाठी पोलीसांकडे जात असल्याचे चित्र परिसरामध्ये दिसत आहे.

अनेक स्वयंघोषित राजकीय पुढार्‍यांची दुकाने बंद झाल्यामुळे त्यांना मात्र प्रामाणिक अधिकारी चुकीचे वाटत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे