ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर वडगाव निंबाळकर पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना

0
5
5
5
4
2
बारामती : दि.03/09/2025 रोजी दुपारी 01:00 ते 03:00 वाजण्याच्या दरम्यान गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकच्या अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली,
बैठकीदरम्यान वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी,सहाय्यक पोलीस निरीक्षक,श्री.नागनाथ पाटील यांनी गणेश मंडळाच्या अध्यक्षांना व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या,

त्यात प्रामुख्याने गणपती विसर्जन मिरवणूकी दरम्यान शासनाने ठरवून दिलेल्या नियमावली प्रमाणे वाद्यांचा वापर करावा, मिरवणूकीमध्ये डिजे सारखी वाद्ये असतील तर त्यांना डेसीबलची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे.तसेच मिरवणूक मुख्य रस्त्या वरून जात असताना सार्वजनिक वाहतुकीस अडथळा होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी व त्याकरीता मंडळांनी स्वयंसेवक नेमणूक करून त्यांना या बाबत जबाबदारी देण्यात यावी,

एकाच गावातील दोन मंडळाच्या मिरवणुकीमध्ये योग्य ते सुरक्षित अंतर ठेवणे,वाहतूकी करिता पोलिसांनी दिलेले निर्देश पाळणे.
दोन समाजात जातीय किंवा धार्मिक तेढ किंवा दोन गटात तेढ निर्माण होईल असे दृश्य देखावे,हावभाव व गाणी न लावणे याची खबरदारी घेण्यात यावी.
त्याचबरोबर विसर्जन घाटापासून विसर्जनाच्या ठिकाणी लहान मुलांना दूर ठेवणे.तसेच विसर्जन मिरवणूक दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेण्यात यावी आणि विसर्जन मिरवणूका वेळेत पूर्ण कराव्यात अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

बैठकीदरम्यान देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे व पोलिसांना सहकार्य करावे,कोणताही अनुचित प्रकार घडल्यास मंडळास व अध्यक्ष/पदाधिकारी यांना जबाबदार ठरवून योग्य ती कारवाई केली जाईल असेही वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक,श्री.नागनाथ पाटील यांनी सांगितले.

यावेळी वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे हद्दीतील प्रमुख गणेश मंडळाचे अध्यक्ष,पदाधिकारी यांच्यासह बहुजन हक्क परिषदेचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष पैलवान श्री.नाना मदने तसेच सुप्रसिद्ध जादूगार,”जादूगार शिवम्” श्री.महेंद्र माने हे बैठकीस उपस्थित होते.





