Breaking
अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

वडगाव निंबाळकर येथे बारामती तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘जाणता राजा युवा प्रतिष्ठान’चा पुढाकार

0 5 9 3 4 2

वडगाव निंबाळकर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल घडावे, या उदात्त हेतूने बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे भव्य तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री छत्रपती जाणता राजा युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा शुक्रवार, दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होणार आहे.

        स्पर्धेचे गट आणि विषय

ही स्पर्धा तीन वयोगटांत विभागली असून, विद्यार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे विषय निश्चित करण्यात आले आहेत,

 * लहान गट (इ. १ ली ते ४ थी): माझे गाव आणि मी, माझी शाळा – माझा अभिमान, स्वच्छता म्हणजेच आरोग्य, आई-वडील – माझे पहिले गुरु.

 

 * मध्यम गट (इ. ५ वी ते ७ वी): AI मुळे अभ्यास सोपा होतो का?, माझे गाव बदलत आहे, मतदान का महत्त्वाचे आहे, वारसा आम्ही शिवरायांचा.

 

 * मोठा गट (इ. ८ वी ते १० वी): जबाबदार नागरिक घडवण्यात शाळेची भूमिका, बिबट्याचा वाढता वावर – मानवी चूक की निसर्गाचा इशारा?, छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती संभाजी महाराज – स्वराज्याचा अखंड प्रवास, शालेय विद्यार्थ्यांसाठी AI संधी की धोका?

     स्पर्धेसाठी नियम 

 * ही स्पर्धा फक्त बारामती तालुक्यातील शाळांतील विद्यार्थ्यांसाठी आहे.

 * सहभागी विद्यार्थ्यांकडे शाळेचे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.

 * विजेत्यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरवण्यात येईल.

 * प्रवेश पूर्णतः विनामूल्य असून, नाव नोंदणी स्पर्धेच्या दिवशी सकाळी ९ ते १० दरम्यान करणे आवश्यक आहे.

या स्पर्धेचे नियोजन बारामती पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य व संस्थापक अध्यक्ष श्री. जितेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. 

अधिक माहिती व नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

 * सुनील जाधव: 98999948685

 * चिंतामणी क्षीरसागर: 9850753600

 * संतोष भोसले: 9850515287

 * संदीप आगम: 7888123549

स्थळ: स्वातंत्र्य विद्या मंदिर / श्री छत्रपती जाणता राजा युवा प्रतिष्ठान, वडगाव निंबाळकर.

दिनांक व वेळ: शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६ | सकाळी १० ते सायं. ५.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे