गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
महिला पोलीस हवालदार लाच लुचपतच्या जाळ्यात, बारामती तालुका पोलीस ठाण्यातील महिला पोलीसावर कारवाई.

0
5
4
4
3
6
बारामती : बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास लोकसेवक महिला पोलीस हवालदार श्रीमती अंजना नागरगोजे ब.नं.2309 यांच्याकडे देण्यात आला होता,
सदर गुन्हयात तक्रारदार व त्यांचे इतर तीन नातेवाईक यांना गेट जामीन देऊन अटक न करण्यासाठी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती तडजोडीअंती तक्रारदार त्यांची पत्नी आणि त्यांचे सासू-सासरे या चार आरोपीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे एकूण 20 हजार रुपये लाचेची मागणी केल्याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी दि.9/9/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पुणे यांच्याकडे फोनद्वारे केली होती.
तक्रारदाराच्या वरील तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पुणे दि.10/9/2025 रोजी तक्रारदार यांना बारामती येथे समक्ष भेटून पडताळणी केली असता बारामती तालुका पोलीस ठाण्यात नेमणूकीस असणाऱ्या श्रीमती अंजना नागरगोजे यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडे त्यांना व त्यांच्या इतर तीन नातेवाईकांना त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये गेट जामीन देऊन अटक न करण्यासाठी 20,000/- रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

वरील प्रमाणे लाच मागणी पडताळणी केल्यानंतर दि. 10/9/2025 रोजी सापळा रचून कारवाई दरम्यान श्रीमती नागरगोजे यांनी तक्रारदाराकडून त्यांच्यावरील कामासाठी बारामती तालुका पोलीस ठाण्याचे आतमध्ये 20,000/- रुपयाची लाच स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. वरील आरोपी लोकसेवक यांच्याविरुद्ध बारामती तालुका पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण या ठिकाणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र,पुणे अपर पोलीस अधीक्षक श्री.अजीत पाटील, ला.प्र.वि. पुणे,अपर पोलीस अधीक्षक श्री.अर्जुन भोसले, ला.प्र.वि. पुणे,यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.





