Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सराईत आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण व बारामती तालुका पोलीस ठाण्याची कारवाई.

0 5 8 6 9 8

बारामती : दि.०९/१०/२०२५ रोजी रात्री ८/४५ वा चे सुमारास जळोची एम.आय.डी.सी रोडवरती जय शंकर पानाच्या दुकाना समोर गुन्हयातील फिर्यादी हे “जय शंकर” पानाच्या दुकानावर थांबले असताना त्या ठिकाणी जयेश बाबासाहेब माने, प्रथमेश बाळू गवळी रा. बऱ्हाणपुर ता. बारामती जि. पुणे, विनोद गणेश जाधव रा. तांदुळवाडी ता. बारामती व  इतर अनोळखी ०४ इसम यांनी मोटारसायकल वरून येवुन फिर्यादी यांना तु गणेश धुळाबापु वाघमोडे याचे सोबत का फिरत होता तु माझी माफी माग असे म्हणत,आरोपी प्रथमेश गवळी याने तु याला माफी मागायला लावू नको आज याला ठेवायचे नाही असे म्हणुन त्याचेकडील कोयत्याने फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण केली,तसेच त्यांचेकडील कोयता हवेत फिरवुन आम्ही येथील भाई आहे असे म्हणुन त्या ठिकाणाहून निघुन गेले.

या गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन स्थानिक शाखा,पुणे ग्रामीण व बारामती तालुका पोलीस ठाणे यांनी वरिष्ठांशी संपर्क केला असता पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल्ल यांनी या गुन्हयातील आरोपी यांना तात्काळ अटक करण्याच्या सुचना दिल्या,

तद्वतच स्थानिक गणेश शाखेचे पोलीस निरीक्षक, अविनाश शिळीमकर आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करून यातील आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकाला तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,या गुन्हयातील आरोपी जयेश बाबासाहेब माने,प्रथमेश बाळू गवळी हे अहिल्यानगर येथील रूई छत्तीशी गावामध्ये लपुन बसले आहेत. 

माहिती प्राप्त झाल्याने तपास पथकाने अहिल्यानगर या ठिकाणी जाऊन अगदी शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले व या गुन्हयाच्या तपासासाठी त्यांना अटक करण्यात आले आहे. 

दरम्यान अटक आरोपी जयेश माने याने गणेश धुळा बापू वाघमोडे याचा बारामती शहरामध्ये साथीदारांसह ऑगस्ट 2024 मध्ये खून केलेला आहे व त्या गुन्ह्यात तो जेलमध्ये होता व तो नुकताच दीड महिन्यापूर्वी जेलमधून सुटलेला आहे अशी माहिती समोर आली आहे. या घटनेतील दोन्ही बाजूंच्या आरोपींचा जुलै 2023 मध्ये सुद्धा वाद झाला होता त्यावेळी जयेश माने याला मारहाण करण्यात आली होती. याचे फिर्यादीवरून गणेश वाघमोडे,गौरव सूळ व इतर, यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता अशीही माहिती समोर येत आहे.

सदरची कामगिरी संदिपसिंह गिल्ल, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण,गणेश बिरादार अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग पुणे ग्रामिण,सुर्दशन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती,अविनाश शिळीमकर,पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामिण, यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन, विक्रम पवार सहा. पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन, पोलीस उप निरीक्षक अमोल कदम,  ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, स्था.गु. शाखा पुणे ग्रामिण, सहा फौजदार एस. जे वाघ,पो.हवा खारतोडे, स्वप्नील अहिवळे स्था.गु. शाखा पुणे ग्रामीण, पोलीस शिपाई होळंबे यांनी केली.

या गुन्हयाचा पुढील तपास विक्रम पवार सहा. पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे