Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची इंदापूर तालुका कार्यकारणी जाहिर.

0 6 2 0 0 5

बारामती: महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष रामहरी राऊत, पुणे जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रजी जेवरे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा प्रमुख भूषण सुर्वे, विशाल धुमाळ यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरेे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यालयात इंदापूर तालुक्याची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

पुरुष कार्यकारिणी: 

इंदापूर तालुकाप्रमुख म्हणून सागर आवटे, तालुका उपप्रमुख अमित शिंगटे, शहरप्रमुख राजेंद्र गारदी, उपशहरप्रमुख प्रविण सातपुते, लोकमतचे पत्रकार ग्रामीणप्रमुख नानासाहेब लोंढे, ग्रामीण उपप्रमुख नारायण पवार, डॉक्टरसेल ग्रामीण प्रमुख संकेत व्यवहारे, ग्रामीण संघटक रघु मदने व दत्ता बांदल, सुरक्षित गलांडे यांच्या निवडी करण्यात आली आहे. 

महिला कार्यकारिणी: इंदापूर तालुका प्रमुख म्हणून महिला सुरेखा लोहार, ज्योती गाढवे यांच्या निवडी करण्यात आली आहे. 

यापुढे इंदापूर तालुक्यात विविध ठिकाणी आरोग्यसेवेचे कॅम्प आयोजित केले जातील. तसेच मुख्यमंत्री सहायता निधी महात्मा फुले जन आरोग्य योजना यामध्ये येणाऱ्या अडचणी यामधून गोरगरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी ही टीम कार्यरत राहील

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे