Breaking
कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्री तनपुरे यांना प्रवेशाची ऑफर ?

0 6 1 1 8 9

अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी

राहुरी: राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना राष्ट्रवादी पक्षात येण्याची ऑफर दिली असल्याचे दिसून आले. यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे काय निर्णय घेणार किंवा त्यांच्या मनात काय आहे हे मात्र समजू शकले नाही.

उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  दि.२७ जुलै २०२५ रोजी सकाळी राहुरी येथील बाजार समिती येथे शेतकरी भवन व उपहार गृहाचा उद्घाटन सोहळा तसेच कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. त्यानंतर अजित पवार यांना बाजार समितीचे सभापती अरुण तनपूरे यांच्या घरी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी कौटुंबिक विषयावर चर्चा केली. त्यावेळी सभापती अरुण तनपूरे यांच्या घरात उप मुख्यमंत्री अजित पवार, सभापती अरुण तनपूरे, कारखान्याचे संचालक हर्ष तनपूरे तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा एकत्रित मोठा फोटो घरातील भिंतीवर लावलेला पाहीला. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे अजित पवार यांच्या शेजारीच बसलेले होते. गप्पा मारता मारता भिंतीवर लावलेल्या त्या फोटोकडे अजित पवार यांचे लक्ष गेले. 

त्यावेळी ते म्हणाले कि, या फोटोत सुनिल तटकरे ऐवजी प्राजक्त तनपुरे पाहिजे होते. त्यावेळी मोठा हशा होऊन अजित पवार यांनी एक प्रकारे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना राष्ट्रवादीत प्रवेशाची ऑफर दिली काय? असा प्रश्न उपस्थितांच्या चेहर्‍यावर दिसून आला.

         यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना विचारले असता त्यांनी सांगीतले कि, राज्याचे उप मुख्यमंत्री माझ्या घरी आल्यानंतर मी त्यांचा पाहूणचार करणे ही मराठी संस्कृती आहे. कुठल्याही राजकीय भूमिके बाबत माझा विचार नसल्याचे यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी सांगीतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे