Breaking
अपघातगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

पुण्यात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ करणाऱ्या ४५५ तळीरामांवर कारवाई; २८२२ बुलेट सायलेन्सरवर फिरवला बुलडोझर

0 5 9 3 3 9

पुणे: होळी आणि धूलिवंदन सणाचे औचित्य साधून पुणे शहर वाहतूक पोलिसांनी शहरात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांविरुद्ध मोठी मोहीम राबवली. या कारवाईत मद्यप्राशन करून गाड्या चालवणाऱ्या ४५५ चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, शांतता भंग करणाऱ्या तब्बल २८२२ बुलेट सायलेन्सरवर थेट बुलडोझर फिरवून ते नष्ट करण्यात आले आहेत.

३ मार्च २०२६ रोजी होळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. यादरम्यान दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ४५५ जणांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सरविरुद्ध मोहीम उघडली होती. आज ४ मार्च रोजी पोलीस उप-आयुक्त कार्यालय, येरवडा येथे ८७० जप्त केलेले सायलेन्सर बुलडोझरखाली चिरडून कायमचे नष्ट करण्यात आले. फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत एकूण २८२२ सायलेन्सरवर कारवाई करण्यात आली आहे.

सायलेन्सर बदलणाऱ्या वाहनधारकांकडून २८ लाख १७ हजार रुपये दंड आकारण्यात आला असून त्यापैकी २३ लाख १५ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.

तसेच फेब्रुवारी २०२६ पासून आतापर्यंत १५,००९ ट्रिपल सीट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यातून तब्बल १ कोटी ४८ लाख ९५ हजार रुपये इतका मोठा दंड आकारण्यात आला आहे.

केवळ कारवाई करून न थांबता, वाहतूक पोलिसांनी मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्या २५० ते ३०० चालकांसाठी आज येरवडा येथे एका विशेष समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पोलीस उप-आयुक्त (वाहतूक शाखा) यांनी स्वतः उपस्थित राहून या चालकांना सुरक्षित प्रवासाचे आणि नियमांचे महत्त्व पटवून दिले.

पुणे पोलिसांचे नागरिकांना आवाहन

पोलीस उप-आयुक्त हिंमत जाधव यांनी नागरिकांना खालील आवाहन केले आहे:

 * मद्यपान करून वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालू नका.

 * सायलेंट झोनमध्ये (रुग्णालये, शाळा) अनावश्यक हॉर्न वाजवू नका.

 * ट्रिपल सीट प्रवास टाळून वाहतूक पोलिसांना सहकार्य करा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे