Breaking
अपघातब्रेकिंगमहाराष्ट्र

चालक दिनानिमित्त माळेगांव पोलीसांकडून वाहन चालकांना शुभेच्छांसह वाहतूक समुपदेशन.

0 5 4 4 3 6

बारामती : माळेगांव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात आज दिनांक 17/09/2025 रोजी चालक दिनाचे औचित्य साधून माळेगांव पोलीसांकडून नीरा बारामती मार्गावर माळेगांव पोलीस ठाण्याजवळ मार्गावरून जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच वाहन चालवताना स्वतःसोबत इतरांचीही काळजी घेत वाहन चालवावे अशा सुचना दिल्या तसेच इतर वाहतूक नियमांची माहिती दिली,

सहायक पोलिस निरीक्षक श्री.सचिन लोखंडे व वाहतूक शाखेचे अंमलदार पो. कॉ.अमजद शेख आणि गणेश खंडागळे‌ यांनी दुचाकी वाहनचालकांना रस्ते अपघाताच्या अनुषंगाने काही मार्गदर्शक सूचना केल्या त्यात वाहन चालवताना आपल्या वाहनांचा वेग कमी ठेवणे, नियमित हेल्मेटचा वापर करणे,शाळा व गर्दीच्या ठिकाणी वाहन सावधगिरीने चालवावे अशा विविध सूचना देऊन आणि त्यासोबत गुलाब पुष्प देऊन सुरक्षित आणि आनंददायी प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या,

“जगाची प्रगती झाली ती चाकाचा शोध लागल्यानंतर आणि दळणवळणाची सुविधा निर्माण झाल्यानंतर…

या सर्व प्रगतीची धुरा ज्याच्या हातात असते तो म्हणजे चालक”

‘आज चालक दिनानिमित्त सर्व ज्ञातअज्ञात चालकांप्रती कृतज्ञता.’

यावेळी माळेगांव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक श्री.सचिन लोखंडे यांच्या सोबत वाहतूक शाखेचे अंमलदार पो. कॉ.अमजद शेख व गणेश खंडागळे हे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे