गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
माळेगाव पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाकडून बस चोरीचा गुन्हा उघड, ७,००,०००/- रू किमतीचा मुददेमाल जप्त.

0
5
9
3
3
9
बारामती : माळेगाव परीसरात चोरीचे प्रमाणे वाढले असल्याकारणाने मा.पोलीस अधिक्षक यांनी सदर गुन्हे उघड करण्याबाबत व त्यावरती प्रतिबंध करण्याकरीता गुन्हे शोध पथकाला व माळेगांव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे यांना सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे लोखंडे यांच्या सुचनेप्रमाणे गुन्हे पथकाने व पोलीस ठाण्याच्या इतर अंमलदारांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त वाढविली होती याच दरम्यान दिनांक २८/०८/२०२५ रोजी रात्री १/०० ते पहाटे ५:०० वा च्या सुमारास माळेगाव राजहंस चौक येथील शनी मदींरासमोरून मयुरेश्वर नावाचे बॅटरीच्या दुकानाच्या शेजारील मोकळया जागेतुन ७,००,००० /- रू कि.चा एक पांढऱ्या रंगाचा फोर्स मोटर्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर (मिनी बस) लावलेली अज्ञात व्यक्तीने चोरी करून नेल्याबाबत सचिन बाबसो कोकरे रा. धुमाळवाडी ता.बारामती जि.पुणे यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली तकार प्राप्त होताच पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी गुन्हे शोध पथकाला बोलावुन सदर चोरी उघड करण्याबाबत मार्गदर्शन व सुचना दिल्या सदर गुन्हयातील ठिकाणचे सी.सी.टि.व्ही फुटेज चेक केले व तांत्रिक बाबीचा अभ्यास करता टेम्पो चालकावर संशय आल्याने चालक प्रदिप रामचंद्र शिंदे रा. कर्हावागज ता. बारामती जि.पुणे यास चौकशी साठी ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने बस चोरी केल्याबाबत कबुली दिली.
आरोपी कडुन चोरीस गेलेला ७,००,०००/- रू किमतीचा फोर्स मोटर्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस ७,००,००० /- रू किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यातील फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून माळेगाव पोलीसठाण्यात गुन्हा नोंद केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार राहुल पांढरे करीत आहेत.
सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक श्री संदिपसिंग गिल सो, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. गणेश बिराजदार, उपविभागिय पोलीस अधिकारी श्री.सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री सचिन लोखंडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक देविदास साळवे, पोलीस हवालदार. राहुल पांढरे, विजय वाघमोडे, अंमलदार अमोल राउत, ज्ञानेश्वर मोरे, नितीन कांबळे, अमोल वाघमारे यांनी केली आहे.





