Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

बारामतीत अवजड वाहनांवर “क्लीनर” बंधनकारक करा, बारामतीतील पत्रकारांचे उपप्रादेशिक परिवहन, प्रांत, व वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन.

0 5 4 4 3 6

बारामती : बारामती शहरात प्रचंड प्रमाणात लहान मोठ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे अनेकदा वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम मोडले जात आहेत आणि त्यातूनच छोटे-मोठे अपघात सतत घडत असल्याचे निदर्शनात येत आहे. 

रविवार (ता. 26) रोजी बारामती शहरातील खंडोबा नगर येथील महात्मा फुले चौकात डंपरच्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला सदर अपघातातील डंपर वर चालकासोबत क्लीनर असता तर कदाचित ही दुर्दैवी घटना घडली नसती. हिच गोष्ट अधोरेखित धरून यापुढे हायवा, डंपर, ट्रक आणि अवजड वाहनांना क्लीनर बंधनकारक करावा यासाठी बारामतीतील पत्रकारांनी बारामती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती प्रांत अधिकारी तसेच बारामती वाहतूक पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

बारामतीतील महात्मा फुले चौकामध्ये डंपर ने तीन जणाला चिरडले ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर बारामती शोककळा पसरली त्याचबरोबर या दुर्घटनेमुळे अनेकांना अश्रू अनावर झाले. या पार्श्वभूमीवर बारामतीतील संतप्त नागरिकांनी महात्मा फुले चौकात रास्ता रोको करत प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला.

बारामतीतील महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत त्याचबरोबर रहदारीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमावा तसेच हायवा, डंपर, ट्रक आणि अवजड वाहनांना क्लीनर बंधनकारक करावा.

बारामती परिसरातील रस्त्यांवर डंपर,हायवा, ट्रक आधी अवजड वाहने ये जा करत असताना सदर वाहनांवर चालकाबरोबर क्लीनर सोबत असायला हवा जेणेकरून होणारे अपघात व त्या अपघातून होणारे मृत्यू टाळता येऊ शकतात.

तसेच अनेकदा या अवजड वाहनांवरील चालक मद्दधुंद अवस्थेत वाहन चालवताना आढळून येत आहेत याबाबत वाहन मालकावर दंडात्मक कारवाई तसेच चालकाचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी बारामतीतील पत्रकार  नवनाथ बोरकर, निलेश जाधव, स्वप्निल कांबळे, मन्सूर शेख, दीपक कापरे, अजिंक्य सातकर, सुरज देवकाते, संजय भिसे, तुषार ओहोळ यांनी निवेदन दिले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे