Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

गावठी हातभट्टीची दारू वाहतूक प्रकरणी  चार जणांवर गुन्हे दाखल, वडगाव निंबाळकर पोलीसांची कारवाई.

0 5 5 5 4 2

बारामती : वडगाव निंबाळकर पोलिसांकडून दोन ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाई मध्ये 240 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू तसेच एक दुचाकी व एका चारचाकी वाहनासह एकूण 566600 (पाच लाख सहासष्ट हजार सहाशे रुपयाचा) मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

दिनांक 18/10/2025 रोजी रात्री आकरा वा.चे.सुमारास पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे निंबुत गावच्या हद्दीत एका संशयित मारूती सुझूकी कंपनीची पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा गाडी क्रमांक 

एम.एच.42 ए.क्यु.1006 ची थांबवून पाहणी केली असता गाडीमध्ये बेकायदेशीर रित्या गावठी हातभट्टीची तयार दारू असलेले निळ्या व काळ्या रंगाचे 35 लिटर मापाचे सहा कॅन मिळून आले. 

याबाबत गाडीमधील चालक अनिरूध्द भालचंद्र तुरकुंडे रा.कसबा बारामती यास गाडीतील मुद्देमालाची विचारणा केली असता हा मुद्देमाल विट्ठल चव्हाण रा.पाहुणेवाडी ता.बारामती यांनी आणण्यास सांगितले आहे असे सांगितले.

सदरचा मुद्देमाल व गाडी जप्त करून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर कारवाईतील मुद्देमाल व चारचाकी वाहनासह एकूण 509600/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सागर देशमाने हे करीत आहेत.

तर दुसऱ्या कारवाईत दिनांक 07/10/2025 रोजी रात्री 10ः00 वाजता च्या दरम्यान मुर्टी ता. बारामती गावच्या हद्दीत एका संशयित मोटार सायकल क्रमांक एम.एच.42 बी.जी.2389 या दुचाकीला हात करून थांबवून पाहणी केली असता दुचाकीवर बेकायदेशीर रित्या गावठी हातभट्टीची तयार दारू 35 लिटर मापाच्या दोन कॅन मध्ये मिळून आली.दुचाकी वरील प्रमोद प्रकाश नवले रा. निंबुत ता.बारामती व शुभम सुरेश सिसोदिया,रा. मारवाडीचाळ, दर्पन टाॅकीज दहोद राज्य गुजरात,यांना गाडीवरील मुद्देमालाबाबत विचारणा केली असता, त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिल्याने, मुद्देमाल व गाडी जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला व मुद्देमाल व मोटार सायकलसह एकूण 57000/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार कुंडलिक कडवळे हे करीत आहेत.

सदरची कारवाई संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण,गणेश बिरादार,अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, सुदर्शन राठोड,उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील,राहुल साबळे,पोलीस उपनिरीक्षक, दिपक वारूळे,पोलीस उपनिरीक्षक 

पोलीस हवालदार कुंडलिक कडवळे,सागर देशमाने, पोपट नाळे,पोलीस शिपाई,विलास ओमासे, अभिजीत जाधव,सूरज धोत्रे यांनी मिळून केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे