Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामती तालुक्यातील मेडद येथे ३.५७ लाखांचा बेकायदा गुटखा जप्त; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

0 8 0 7 1 9

बारामती : तालुक्यातील मेडद येथे माळेगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत तब्बल ३ लाख ५७ हजार ३२१ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला जप्त केला आहे. याप्रकरणी रामदास बाळू मोरे याला अटक करण्यात आली असून, त्याला ४ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल आणि बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी अवैध गुटखा विक्री आणि वाहतुकीवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. या अनुषंगाने, माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, मेडद येथील रामदास बाळू मोरे हा चोरून प्रतिबंधित गुटख्याची विक्री आणि साठवणूक करत आहे. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने मोरे याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुटखा साठवल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासन (FDA), पुणे येथील अधिकारी लक्ष्मीकांत साबळे यांना याची माहिती दिली. पोलीस, पंच आणि अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांनी एकत्रितपणे मेडद गावच्या हद्दीतील मोरेवाडी येथील शेती गट नंबर ५७४ मध्ये असलेल्या आरोपीच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत घरातून ३,५७,३२१ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा मिळून आला.
आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, त्याने हा माल गौरव जोगदंड (रा. तांदुळवाडी, बारामती) आणि गणेश मदने (रा. बारामती) यांच्याकडून आणल्याची कबुली दिली. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी लक्ष्मीकांत साबळे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या रामदास मोरे याला न्यायालयात हजर केले असता, त्याची ३० जून ते ४ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कस्टडीत रवानगी करण्यात आली आहे. या आरोपीवर यापूर्वीही माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर भटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे तसेच पोलीस अंमलदार विजय वाघमोडे, राहुल पांढरे, अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, भैरवनाथ बोगटे, सागर शिंदे, जयसिंग कचरे, अमोल कोकरे, अमोल वाघमारे, धीरज कांबळे आणि सागर पवार यांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे