Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

२०० लिटर गावठी हातभ‌ट्टी दारु तयार करत असताना धाड, वडगांव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई.

0 6 3 3 2 1

बारामती: सावंतवस्ती,वाघळवाडी ता‌.बारामती येथे एका राहत्या घरात जवळ गावठी दारू तयार करण्याच्या भट्टीवर वडगाव निंबाळकर पोलिसांनी धाड टाकत 64400/-रूपयाचा माल जप्त केला.

वडगांव निंबाळकर पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दिनांक 08/09/2025 रोजी रात्री 08:30 वा चे सुमारास सावंतवस्ती वाघळवाडी ता‌.बारामती येथे एका घरा जवळील मोकळ्या पडीक जागेत 200 लिटरच्या लोखंडी बॅलर मध्ये गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या रसायनाला भट्टीवर जाळ लावून काठीने ढवळीत असताना काहीजण दिसले परंतु पोलीसांची चाहुल लागताच ते अंधाराचा फायदा घेवुन घराच्या पाठीमागील झाडीत पळुन गेले, या ठिकाणची पाहणी केली असता तेथे भट्टीवर पाच बॅलर व त्यामध्ये गावठी हातभटटीची दारू तयार करायचे कच्चे रसायन तसेच 56000/-रूपये किंमतीचे 200 लीटर मापाचे पाच लोखंडी बॅरल त्यामध्ये प्रत्येकी 200 लिटर गावठी हातभ‌ट्टीची दारु तयार करायचे 1000 लिटर कच्चे रसायन तसेच सात रिकामे लोखंडी बॅलर व इतर साहित्य असा एकुण 64400/-रूपयाचा माल मिऴुन आला.

या बाबत श्री.नागनाथ ज्ञानोबा परगे,पोलीस शिपाई नेमणुक वडगांव निंबाळकर पोलीस ठाणे ता.बारामती जि.पुणे यांनी फिर्याद दिली आहे.

या कारवाईत आरोपी विजय सुभाष नवले,अनिल रूपसिंग नवले,शैलेश शंकर नवले सर्व रा.सावंतवस्ती वाघळवाडी ता.बारामती जि.पुणे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पो हवा.रमेश नागटिळक हे करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे