ब्रेकिंगमहाराष्ट्र
माळेगांव ता.बारामती पोलिसांच्या वतीने रूट मार्च व दंगा काबूची रंगीत तालीम, गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर हद्दीत रूट मार्च

0
6
0
2
1
2
बारामती: आगामी श्री गणेशोत्सव तसेच ईद-ए-मिलाद सणाचे पार्श्वभूमीवर दिनांक 26/08/2025 रोजी माळेगाव बुद्रुक ता.बारामती जि.पुणे या नगरपंचायत हद्दीत माळेगाव पोलीस ठाणे ते राजहंस चौक तसेच नगरपंचायत कार्यालय ते जामा मस्जिद, खडक आळी जोशीवाडा,क्रीडा संकुल ते माळेगाव पोलीस ठाणे असा रूट मार्च सकाळी 11.15 वा.ते सकाळी 11.40 वा.चे दरम्यान घेतला.

या रूट मार्च सकाळी नंतर स.11.45 वा. ते दुपारी 12.30 वा.चे दरम्यान बारामती तालुका क्रीडा संकुल मैदान, माळेगाव बुद्रुक मैदान येथे दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.

या रूट मार्च मध्ये माळेगांव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी,सहायक पोलीस निरीक्षक,श्री.सचिन लोखंडे पोलीस उपनिरीक्षक,श्री.अमोल खटावकर,पोलीस उपनिरीक्षक,श्री.देविदास साळवे,पोलीस उपनिरीक्षक,श्री.शरद तावरे यांच्या सह माळेगांव पोलीस ठाण्याचे 20 अंमलदार 10 होमगार्ड अशा कर्मचाऱ्यांच्या तैनातीत हा रूट मार्च व दंगा काबूची रंगीत तालीम घेण्यात आली.




