Breaking
अपघातब्रेकिंगमहाराष्ट्र

पालखी सोहळ्यात वाहन घेऊन जाण्यापूर्वी हि तपासणी महत्वाची, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे आवाहन 

0 6 1 9 8 2

पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वाहनांची तांत्रिक तपासणी करुन घेण्याचे आवाहन

बारामती, दि. १३: श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वाहनांची संबंधित वाहनचालकांनी १९ जून २०२५ पर्यंत तांत्रिक तपासणी करुन घ्यावे, पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वाहनचालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. 

पालखी सोहळ्यावेळी देहू, आळंदी ते पंढरपूर या दरम्यान पालखी मार्गावर प्रवासी तसेच जड वाहने मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या वाहनांतील तांत्रिक दोषांमुळे अपघात होऊ नयेत, वाहने रस्त्यात बंद पडून वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठीची उपाययोजना म्हणून वाहनचालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती अंतर्गत बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यात वायुवेग पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहनचालकांनी आपल्या वाहनांची तांत्रिक तपासणी करुन घ्यावी.

वाहन तपासणीवेळी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, कर, विमा प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र व वायू प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र, अनुज्ञप्ती व वाहतूक परवाना मुदतीत असल्याबाबतचे सर्व कागदपत्रे सोबत घेवून जावे. ही तपासणी विनामूल्य असून वाहन तपासणी केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. अधिक माहिती करीता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील सहायक मोटार वाहन निरीक्षक संजय भापकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे. 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे