गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसोशल मिडिया
धार्मिक तेढ निर्माण करणारे स्टेटस किंवा मजकूर सोशल मिडीयावर ठेवाल तर कडक कारवाई, बारामती शहरात एकावर गुन्हा दाखल – अप्पर पोलीस अधिक्षक बारामती,श्री.गणेश बिरादार
धार्मिक तेढ निर्माण करणारे स्टेटस सोशल मिडीयावर ठेवणाऱ्या इसमावर विशेष कार्यकारी दंडांधिकारी तथा अप्पर पोलीस अधिक्षक बारामती, श्री. गणेश बिरादार यांची कडक कारवाई

0
5
5
5
4
2
बारामती : एका इसमाने आपल्या व्हाट्सअप स्टेटस वर औरंगजेबाचा फोटो ठेवून त्यावर धार्मिक तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर ठेवला आहे.अशी माहिती दिनांक ०२/०३/२०२५ रोजी बारामती शहर पोलीस ठाण्यात मिळाली होती,

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने लागलीच त्या इसमास बारामती पोलीसांच्या मार्फत ताब्यात घेऊन त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यावर मिळालेल्या माहितीच्या अनुसार औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारा फोटो व आक्षेपार्ह मजकूर मिळून आला.

या इसमाच्या कृत्यामुळे धार्मिक तेड निर्माण होऊन बारामती शहर हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी,पोलीस निरीक्षक, श्री.विलास नाळे, यांनी त्याचे विरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १२७ प्रमाणे प्रस्ताव तयार करून तो बारामतीचे विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक श्री.गणेश बिरादार यांना सादर केला असता यावर सुनावणी घेऊन या इसमाची कृती ही धार्मिक तेढ निर्माण करणारी असल्याची खात्री झाल्याने, प्रतिबंधक उपाययोजना म्हणून, त्याने योग्य व लायक जामिनदार न दिल्याने त्याची १४ दिवसांकरीता येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे.





