गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
मोबाईल टॉवरच्या केबल चोरी करणारी टोळी शिताफीने गजाआड सुपा पोलीस स्टेशनची कामगिरी

0
5
9
3
3
9
बारामती : दि.०८/१०/२०२५ रोजी पो. हवालदार राहुल भाग्यवंत हे सुपा पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्त करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,तरडोली, ता. बारामती, जि.पुणे गावचे हद्दीत शंकर खरात यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेड मध्ये काहीजण चोरलेल्या मोबाईल टॉवरचे केबल तसेच मोटारीच्या केबल यामधील तांब्याच्या तारा काढत आहेत. मिळालेल्या बातमीची खात्री करण्याकरीता प्रभारी अधिकारी स.पो.नि.मनोजकुमार नवसरे,पो.हवा. भाग्यवंत, पो.शि. ताडगे, विरमे, मवाळ असे पहाटे ०३:०० वाजताचे सुमारास त्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी १) ओम राजेंद्र कासवदे, वय १९ वर्षे, २) संतोष सतिश गायकवाड, वय १९ वर्षे, ३) करण भाऊसाहेब आरवडे, वय १९ वर्षे, सर्व रा.मोरगाव, ता. बारामती, जि.पुणे, ४) आण्णा आंबादास कोकाटे, वय २९ वर्षे, रा.कुंभेजा, ता. परांडा, जि.धाराशीव हे केबल मधुन तांब्याच्या तारा काढत असताना मिळुन आले.
सदर ठिकाणची पाहणी केली असता तेथे ३ केबल कटर, टॉवर केबल व सोललेल्या तांब्याच्या तारा मिळुन आल्या. मिळुन आलेल्या मालाबाबत त्यांच्या कडे चौकशी केली असता ते कोणत्याही प्रकारचे समाधानकारक स्पष्टीकरण देवु न शकल्याने त्याचे विरूद्ध सुपा पोलीस स्टेशन गु.र.नं.१७७/२०२५ महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या चारही लोकांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दि.०३/१०/२०२५ रोजी ते दि.०६/१०/२०२५ रोजीचे दरम्यान सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील तरडोली, बाबुर्डी, कुतवळवाडी गावचे हद्दीतील मोबाईलचे टॉवर वरील केबलची चोरी करून त्या सोलुन त्यामधील तांब्याच्या तारा काढलेल्या आहेत अशी कबुली दिली. या चोरी बाबत मोबाईल टॉवरचे मॅनेजर यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन सुपा पोलीस ठाण्यात एकुण ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या आरोपींना गुन्हाच्या कामी अटक करून त्यांना दि.०९/१०/२०२५ रोजी मे. कार्टात हजर केले असता त्यांना दि.१०/१०/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमान्ड मंजुर केला आहे.
त्यांच्या कडुन गुन्हातील चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्हात वापरलेल्या दोन मोटर सायकली असा एकुण अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हाचा पुढील अधिक तपास करीत सहा. फौजदार वाघोले व पो.हवा. गजरे करीत आहेत. आरोपी यांचे कडे मोबाईल टॉवरचे केबल चोरीच्या अनुषंगाने अधिक तपास चालु असुन आणखीण काही गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी श्री. संदिपसिंह गिल्ल साो, पोलीस अधिक्षक, श्री. गणेश बिरादार, अपर पोलीस अधिक्षक बारामती, श्री. सुदर्शन राठोड उप. विभागीय पोलीस अधिकारी यांचें मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मनोजकुमार नवसरे, पोसई कोळी, पोसई मोहरकर, पोसई जयंत ताकवणे, सहा फौजदार वाघोले, पो.हवा. राहुल भाग्यवंत, विशाल गजरे, रुपेश साळुंके, संदिप लोंढे, अनिल दणाने पो.कॉ अमोल चिरमे, किसन ताडगे, महादेव साळुंके, तुषार जैनक,निहाल वणवे, सागर वाघमोडे, सचिन दरेकर, यांनी केलेली आहे.





