Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी

‘पुणे ग्रामीण पोलिसांचा ‘ॲक्शन पॅटर्न’; जिल्हाभरात अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले, गुन्हेगारांचे धाबे दणाणले!

पुणे ग्रामीण पोलिसांच्या 'झिरो टॉलरन्स' मोहिमेने अवैध धंदे भुईसपाट; जिल्हावासियांकडून कामगिरीचे कौतुक

0 6 1 1 8 9

“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय”! 

पुणे/बारामती : पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस प्रशासन सध्या पूर्णतः ‘ॲक्शन मोड’ मध्ये आले आहे. पोलीस अधीक्षक (SP) आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या विशेष ‘कोम्बिंग ऑपरेशन’ आणि धडक मोहिमांमुळे गुन्हेगारी विश्वात पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा वचक निर्माण झाला आहे.

काही दिवसांपूर्वी ग्रामीण भागातील वाढत्या गुन्हेगारीवरून पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी आपल्या धडाकेबाज कामगिरीतून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांनी कारवाया करत पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. केवळ कारवायांचा कागदी सोपस्कार न करता, प्रत्यक्षात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आणि त्यांना कायद्याचा हिसका दाखवण्याचे काम ग्रामीण पोलीस दल प्रभावीपणे करत आहे.

विशेष म्हणजे गुन्हेगारी टोळ्यांवर नजर ठेवण्यासाठी गस्त (Patrolling) अत्यंत कडक करण्यात आली आहे. “गुन्हेगार कोणताही असो, गय केली जाणार नाही,” हा पोलीस अधिक्षकांचा स्पष्ट संदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि स्थानिक पोलिसांनी आपल्या कृतीतून दिला आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे.

तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी केवळ कारवाईचा बडगाच उगारला नाही, तर सामाजिक भान जपत जनजागृतीवरही भर दिला आहे. जिल्ह्यातील अनेक सराईत गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ (MPDA) आणि तडीपारीसारख्या कडक प्रतिबंधात्मक कारवाया करून गुन्हेगारीला चाप लावण्यात आला आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, “खाकीचा दरारा” पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

नागरिकांनीही पुणे ग्रामीण पोलिसांच्या या सकारात्मक आणि आक्रमक भूमिकेचे स्वागत केले आहे. अवैध धंद्यांविरुद्धच्या या लढ्यात पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले असून, अहोरात्र मेहनत घेणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे जिल्हावासियांकडून विशेष कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे