गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
वडगाव निंबाळकर पोलिसांकडून जुगार अड्ड्यावर छापा,चार दुचाकीसह सात जणांवर कारवाई.

0
6
0
7
4
9
बारामती : दिनांक,12/09/2025 रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास पळशी ता, बारामती गावच्या हद्दीत पिंगळेवस्ती येथील एका बंद असलेल्या पडक्या घराच्या आडोशाला मोकळया जागेत काहीजण तेरा पानी जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती,मिळालेल्या माहितीनुसार वडगाव निंबाळकर पोलीसांनी त्या ठिकाणी छापा मारला,
या छाप्यात सात जणांसह,चार दुचाकी व रोख रक्कम आणि काही पत्त्यांची बंडले मिळून आली आहेत.

याबाबत श्री.विकास बळवंत येटाळे,पोलीस शिपाई नेमणुक वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीनुसार,आरोपी मारूती आण्णा इजगुडे ,नारायण विट्ठल करे,संतोष जयसिंग गुलदगड,रघुनाथ जगन्नाथ सोनवलकर,अंकुश विठोबा केसकर सर्व रा.पळशी ता.बारामती जि.पुणे आणि गजानन रामा कडाळे,लक्ष्मण माने पुर्ण नाव माहित नाही दोघे रा.पळशी ता.बारामती जि.पुणे यांच्यावर गु.र.नं : 228/2025 मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत दुचाकीसह एकूण 63 हजार 30 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस नाईक भाऊसाहेब मारकड हे करीत आहेत.




