Breaking
अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्यसेवा, बारामती येथे तुकाराम महाराजांच्या पालखी दरम्यान आरोग्य सेवा अर्पण 

0 6 9 0 4 0

बारामती: काल दिनांक २६/०६/२०२५ रोजी श्री.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त संपूर्ण बारामती तालुक्यातील भाविकभक्त श्री.संत तुकाराम महाराजांच्या पालखी व वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी आतुर होते यासाठी रस्त्याच्या दुतर्फा बाजुला विविध संस्था, संघटना,मंडळे,तसेच शासकीय संस्थांच्या अनेक कार्यालयांनी आपापले स्वागत कक्ष उभारले होते.

संध्याकाळी साधारण पाच वाजण्याच्या दरम्यान तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती नगरीत आगमन झाले.

दरम्यान पाटसरोडवर उभारण्यात आलेल्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या स्वागत कक्षावर दुपारपासूनच सुर असलेल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत पाणी वाटप,तसेच औषध गोळ्या,मलम वाटप करण्यात आले.

पालखी आगमनानंतर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख श्री.मंगेशजी खताळ यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ.शशिकलाताई काळे, उपजिल्हाप्रमुख सौ.सुनीताताई डोंबाळे,वैद्यकीय मदत कक्षाचे तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख हनुमंत देवकाते(पाटिल),बारामती विधानसभा क्षेत्र समन्वयक श्री.सुशीलकुमार अडागळे,

तालुकाप्रमुख श्री.अनिलजी कदम,शहर प्रमुख कृष्णमूर्ती जगताप,उपसमन्वयक प्रवीण माकर,अनिल काळे,सुरेश कात्रे तसेच इंदापूर तालुकाप्रमुख,उप तालुका प्रमुख श्रीमती ज्योती गाढवे व सौ सुरेखा लोहार,आरोग्य सहाय्यक पुणे सौ.शोभा बिराजदार तसेच वैद्यकीय क्षेत्रात कायम तत्पर असणारे भीमसेन माने तसेच सोनाली ताई लवटे मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष संतोषजी गोलांडे श्री.चोपडे श्री.लंबाते साहेब आणि आरोग्य सहाय्यक मोसिन शेख यांच्यासह नवनिर्वाचित पदाधिकारी हसीना ताई डांगे, राजश्रीताई धेंडे,रेखाताईंना रनवरे सौ.कमल लोंढे व इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

दरम्यान तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी संपूर्ण वारी दरम्यान उपस्थित असणारे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबईचे पदाधिकारी श्री.ओम पालकर साहेब तसेच दिपकजी तोडकरी यांचा बारामती तालुका वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे