Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी दोन आरोपींना कारावास व दंड, बारामती जिल्हा न्यायाधीश नं.३ यांचा निकाल 

0 5 4 4 2 6

बारामती : दिनांक ०८/०९/२०२५ रोजी बारामती येथील मे. जिल्हा न्यायाधीश नं. ३ मा. हितेंद्र अनिलकुमार वाणी सो, यांनी आरोपी नाव किरण लक्ष्मण खराडे व आकाश कैलास ताकवणे रा. हिंगणीगाडा ता. दौंड जि. पुणे यांना शासकीय कामात अडथळा आणून मारहाण, व धमकी दिल्याबद्दल आरोपीस २ वर्षे सक्त मजुरी ५०००/- रूपये व दंड ठोठावला आहे.

थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक ०४/०१/२०२३ रोजी आरोपी यांनी फिर्यादी बाळासाहेब हरिशचंद्र चव्हाण (तलाठी) वासुंदे, हे शासकीय काम करत असताना व शासकीय काम घेवून एसटी स्टॅड कडून मंडल अधिकारी पाटस यांचे कडे जात असताना आरोपी किरण लक्ष्मण खराडे व आकाश कैलास ताकवणे यांनी लोकसेवक तलाठी यांना सरकारी कामात मारहाण केल्याप्रकरणी व शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे यवत पोलीस स्टेशनला गु.र. नं १३/२०२३ अन्वये फिर्यादी यांनी फिर्याद दाखल केली सदरील गुन्ह्याचा तपास तात्कालीन सहायक पोलीस निरिक्षक केशव वाबळे यांनी केला व तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सदरील केसमध्ये फिर्यादी पक्षातर्फे फिर्यादी, पंच, साक्षीदार व तपासी अधिकारी यांची साक्ष नोंदविली केसमध्ये सरकार पक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता विकास घनवट यांनी काम पाहिले त्यांचा युक्तीवाद मे. न्यायालयाने ग्राहय धरुन शासकीय कर्मचा-यास अडथळा अणून मारहाण केल्याबद्दल दोन्ही आरोपींना २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व ५०००/- तसेच धमकी दिल्याब‌द्दल किरण लक्ष्मण खराडे याला १ वर्षे सश्रम कारावासाची व २०००/- रूपये दंड शिक्षा सुनवली. सदर प्रकरणी पो.स.ई. गोरख के. कसपटे यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले,आणि पोलीस हवालदार वेनूनाद ढोपरे यांनी मोलाचे सहकार्य केले.

1/5 - (1 vote)

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे