अभिव्यक्तीगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या डिजे चालकावर वडगांव निंबाळकर पोलीसात गुन्हा.

0
5
8
4
3
4
बारामती : होळ ता.बारामती येथे दि. 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजता होळ गाव ते वाणेवाडी रस्त्यावर साहित्यरत्न,आण्णाभाऊ साठे सभागृहाजवळ एका टाटा कंपनीच्या 407 गाडी क्र. एमएच-43 एडी 1955 वर बसवलेली जे.एम.पॉवर “सुप्याचा बकासुर” नावाची साऊंड सिस्टीम मोठ्या आवाजात सुरू होती याचा परिसरात मोठा आवाज येत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. व हि गाडी रस्त्यावर उभी असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतुकीसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती.

तसेच त्याच्या कर्णकर्कश आवाजाने सार्वजनिक शांतता भंग होऊन सार्वजनिक उपद्रव झाल्याचे श्री. दिलीप गोविंद सुतार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक,वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार सार्वजनिक ठिकाणी कर्णकर्कश आवाजात साऊंड सिस्टीम वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या दिपक लक्ष्मण भंडलकर वय 30 वर्षे रा. सुपा ता.बारामती जि. पुणे याच्यावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार श्री.सागर चौधरी हे करीत आहेत.




