Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

करंजे,ता.बारामती येथे दोन गुन्ह्यात देशी दारू विक्री प्रकरणात वडगांव निंबाळकर पोलिसांची कारवाई 

0 5 9 3 3 9

बारामती : दिनांक 30/09/2025 रोजी करंजे ता.बारामती जि पुणे गावचे हद्दीत वडगाव निंबाळकर पोलिसांकडून देशी दारू विक्री प्रकरणात कारवाई करण्यात आली.

या मध्ये सुवर्णा नंदकुमार जाधव वय 58 वर्षे, रा.करंजे,ता.बारामती या महिलेकडे एका 10 लीटर मापाचे प्लॅस्टीकच्या पांढऱ्या रंगाच्या कॅन मध्ये 7 ली.गावठी हातभट्टीची तयार दारू अंदाजे किमंत 720/- चा माल मिळुन आला.या बाबत निलेश चंद्रकांत जाधव पोलीस शिपाई नेमणुक वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण यांनी फिर्याद दिली आहे.

तर दुसऱ्या कारवाईत ॲंथनी अब्दुल मुलाणी वय 32 वर्षे रा.करंजे,ता.बारामती याचेकडे बेकायदेशीरपणे बिगर परवाना देशी दारू सखु संत्रा नावाच्या 90 मिलीच्या मापाच्या 42 नग सिलबंद बाटल्या, प्रत्येकी किमंत 40 रू असा एकूण 1680/- रू किमतीचा माल जवळ बाळगुन त्याची लोकांनी विक्री करीत असताना मिळुन आला आहे.

याबाबत सागर पांडुरंग देशमाने पो.हवालदार नेमणुक वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण यांनी फिर्याद दिली आहे.

दोन्ही फिर्यादीवरून वडगांव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना करण्याची तजवीज ठेवलेली आहे.पुढील अधिकचा तपास वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी,सहायक पोलिस निरीक्षक, श्री.नागनाथ पाटिल व पोलीस उपनिरीक्षक श्री.राहूल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रमेश नागटिळक व पोलीस हवालदार अमोल भोसले हे करीत आहेत.  

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे