Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांची पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील शेवटच्या तालुक्यात भेट,- इंदापूर पोलीस ठाण्यास भेट देऊन विविध समस्यांचा आढावा.

0 5 4 4 3 6

बारामती: : पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी इंदापूर पोलिस ठाणे गाठले आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेत व त्याचबरोबर इतर समस्याही जाणून घेतल्या व त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना देखील केल्या.

यामध्ये प्रामुख्याने इंदापूर शहरातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी ठोस प्रयत्न करणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक यांनी दिली.

त्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती घेत तसेच येणाऱ्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील मुक्कामस्थळे व मार्ग या ठिकाणची व्यवस्था याबाबत आढावा घेतला.

त्यानंतर पत्रकारांसोबत संवाद साधत शहर व तालुक्यातील विविध समस्या जाणून घेतल्या शहरातील जुन्या मार्गावर विविध शासकीय कार्यालये,न्यायालय, पंचायत समिती, बसस्थानक यासह शाळा व महाविद्यालये असल्याने या ठिकाणी सतत वाहतुकीची समस्या निर्माण होत असते.

यामुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत समस्या मांडण्यात आल्यानंतर गिल यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड व पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना या प्रश्नांवर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांबरोबर स्वतंत्र बैठक घेण्यासाठी व उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. 

कोणत्याही परिस्थितीत वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत योग्य त्या सुचना यावेळी करण्यात आल्या.

भेटी दरम्यान बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन मोहिते उपस्थित होते.

दरम्यान, तालुका पोलिस ठाण्याच्या इमारतीबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, अशी ही माहिती पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी या भेटी दरम्यान दिली.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे