अपघातब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिकसोशल मिडिया
बारामती शहर पोलिसांचे अनोळखी मयत व्यक्तीसाठी आवाहन.

0
6
2
7
7
3
बारामती : दिनांक 17/09/2025 रोजी डोर्लेवाडी ता. बारामती जिल्हा पुणे गावच्या हद्दीत एक इसम रुग्णावस्थेत मिळून आल्याने त्यास 108 नंबरच्या ॲम्बुलन्सने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व सर्वोपचार रुग्णालय बारामती( शासकीय मेडिकल कॉलेज) येथे औषध उपचारासाठी दाखल केले, उपचार सुरू असताना ती व्यक्ती दिनांक18/09/2025 रोजी 08/00 वाजण्याच्या सुमारास मयत झाली आहे.
अनोळखी मयत पुरुषाचे वय अंदाजे 45 ते 50 वर्ष असावे ,नाव पत्ता माहीत नाही, डोक्यास काळे पांढरे वाढलेले केस तसेच दाढी वाढलेली व दाढीस काळे पांढरे केस, अंगात पांढऱ्या रंगाचा फुल भाईचा बटनाचा शर्ट व कमरेस काळ्या रंगाचा करदोडा आहे, मयत व्यक्ती हा डाव्या डोळ्यात अपंग असण्याची शक्यता आहे.
वरील फोटोतील व नमूद वर्णनाच्या व्यक्तीस अगर त्याचे नातेवाईकांना कोणी ओळखत असल्यास खाली नमूद केलेल्या नंबरवर संपर्क करावा असे बारामती शहर पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे.
संपर्क करण्यासाठी नांव व संपर्क क्रमांक
श्री.डी. व्ही.जाधव,
पोलीस हवालदार,
बारामती शहर पो.स्टे.
मो.नं. 9021803403
बारामती शहर पोलीस स्टेशन
मो.नं.9552069100






