गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
खुनातील आरोपी जेरबंद, सुपा ता,बारामती, पुणे ग्रामीण पोलिसांची कर्नाटकात कारवाई.
सुपा पोलीसांनी दमदार कामगिरी करत खून करून मृतदेह मुरूमाच्या ढिगा-यात गाढ्न ठेवणा-या आरोपीस कर्नाटक राज्यातून शिताफीने अटक केली आहे

0
6
5
1
1
2
बारामती: सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील हरविलेल्या व्यक्ती संदर्भात दाखल असलेल्या तक्रारीचा तपास चालु असताना सुपा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांना फोनद्वारे माहिती मिळाली की,मौजे नारोळी ता. बारामती जि पुणे गावचे हद्दीत छाया रमेश महाडिक यांचे बांधकाम चालु असलेल्या फार्म हाउसचे मुरूमाचे ढिगा-याखालुन कसलातरी उग्र वास येत आहे. माहिती मिळताच नवसरे व त्यांच्या सोबत पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली असता सदर ठिकाणी एक अनोळखी पुरूषाचा मृतदेह मुरूमाखाली पुरलेल्या अवस्थेत मिळुन आला होता त्या मृतदेहाची पाहणी केली असता तो मृतदेह सुपा पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्ती संदर्भात दाखल तक्रारीतील गणेश शंकर चव्हाण वय ४९ वर्षे, रा. आंद्रफळी ता. शिराटी जि.गदक राज्य कर्नाटक सदया रा. नारोळी ता. बारामती जि पुणे याचा असल्याचा संशय आल्याने त्याचे नातेवाईक यांना बोलावुन खात्री केली, नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख केली असता गणेश शंकर चव्हाण याचाच हा मृतदेह असल्याचे सांगितले होते.सदर मयताचा प्रथमदर्शी तपासात खुन हा नागराज उर्फ नागेश विरूपक्षाअप्पा गडियप्पनवर वय ३४ वर्ष, रा. असुंडी ता. राणेबेन्नुर जि. हावेरी राज्य कर्नाटक याने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून खुन केल्याचा निष्पन्न झाले.
सदर बाबत रूपेश दिनानाथ साळुंखे पो. हवालदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नागराज उर्फ नागेश विरूपक्षाअप्पा गडियप्पनवर याचेविरूध्द सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान सुपर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री नवसरे यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांच्या २ टिम तयार करून आरोपीचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या व तपास पथके रवाना केली.
या गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक माहिती तसेच गोपनिय माहीतीचे आधारे आरोपी हा ता. राणेबेन्चुर जि. हावेरी राज्य कर्नाटक येथे असल्याची माहिती मिळाली, श्री नवसरे यांनी पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार रुपेश सांळ्खे, पोलीस शिपाई किसन ताडगे, निहाल वणवे अशी एक टिम आरोपीच्या ता. राणेबेन्नूर जि. हावेरी राज्य कर्नाटक येथे रवाना केली.या पथकाने ता. राणेबेन्नूर जि. हावेरी राज्य कर्नाटक येथे जावुन स्थनिक पोलीस तसेच गोपनिय बातमीदाराच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला व त्यास शिताफीने ताब्यात घेतले.

आरोपीस पुढील तपासासाठी सुपा पोलीस ठाणे येथे आनुन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली.
या गुन्हयाचे तपासकामी आरोपीस न्यायालयात हजर केला असता मा. न्यायालय यांनी आरोपीस दि.०६/१०/२०२५ रोजीपर्यंत ०४ दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे.

पुढील तपास जिनेश कोळी पोलीस उपनिरीक्षक सुपा पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री. संदिपसिंह गिल्ल,पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण,श्री.गणेश बिरादार,अपर पोलीस अधिक्षक,श्री सुदर्शन राठोड,उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, श्री.मनोजकुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक, श्री.जिनेश कोळी, पोलीस उपनिरीक्षक,जयंत ताकवणे, पो. हवा. रुपेश साळुंके, संदिप लोंढे, विशाल गजरे, पो. कॉ. तुषार जैनक, किसन ताडगे, सागर वाघमोडे, महादेव साळुंके, निहाल वणवे यांनी केलेली आहे.





