गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बनावट इंस्टाग्राम अकाउंट वरून ब्लॅकमेल: नग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडून नग्न फोटो व व्हिडिओ वायरल करण्याची धमकी देणारा आरोपी अटकेत

0
7
9
4
1
5
बारामती: वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका पीडितेला ब्लॅकमेल करून तिचे अश्लील फोटो व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी करंजे (ता. बारामती) येथील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

दिपक मधूकर दुबळे (रा. करंजे, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२६ ते ३ जुलै २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. आरोपीने इन्स्टाग्रामवर एका पीडितेच्या नावाने बनावट अकाऊंट (फेक आयडी) तयार केले होते. या अकाऊंटवरून त्याने फिर्यादी पीडितेला सुरुवातीला उघडे फोटो पाठवले. त्यानंतर, तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ मिळवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. पीडितेने नकार दिल्यास फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत त्याने पीडितेला नग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडले.
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने हे नग्न फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये जतन करून ठेवले. त्यानंतर हेच फोटो फिर्यादी पीडितेच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तींना पाठवून तिची जाणीवपूर्वक बदनामी केली. या सर्व प्रकारामुळे पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य आरोपीने केले.



