Breaking
अपघातगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

‘महाराष्ट्र पोलीस कारनामा’ MPK NEWS च्या बातमीने प्रशासन खडबडून जागे; पहाटेच उपप्रादेशिक परिवहन विभागाची धडक कारवाई

0 6 1 1 9 2

बारामती: ‘महाराष्ट्र पोलीस कारनामा’ (MPK NEWS) ने बारामती तालुक्यातील विनापरवाना कचरा आणि दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबतचे ‘टाईम मॅनेजमेंट’ उघड करताच, प्रशासकीय यंत्रणेला जाग आली आहे. या खळबळजनक बातमीची दखल घेत, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) मंगळवार, ३ मार्च २०२६ रोजी पहाटेच विशेष मोहीम राबवून नियमबाह्य वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला.

बारामतीत आरटीओ आणि ‘ऑफ-ड्यूटी’ वेळेचा फायदा घेत पहाटे आणि रात्री उशिरा विनापरवाना चालक कचरा आणि दूध वाहतुकीच्या नावाखाली नागरिकांचा जीव धोक्यात घालत होते व आहेत. 

महाराष्ट्र पोलीस कारनामा ‘MPK NEWS’ मुळे “बारामतीत विनापरवाना चालकांचा टाईम मॅनेजमेंट गेम” या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घातले होते.

बातमी प्रसिद्ध होताच, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. सुरेंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आरटीओ पथकाने आज पहाटेपासून सकाळी ८ ते ८:३० च्या सुमारास बारामती शहर आणि ग्रामीण भागात अचानक नाकाबंदी केली. या कारवाईत प्रामुख्याने खालील बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले,

नगर परिषद/ग्रामपंचायत कचरा वाहने: परवाना नसलेले चालक आणि कागदपत्रांची कमतरता असलेल्या गाड्यांवर कारवाई.

दूध वाहतूक टँकर्स: फिटनेस प्रमाणपत्र (Passing), पीयूसी आणि विमा नसलेल्या मोठ्या टँकर्सची कसून तपासणी.

अल्पवयीन व विनापरवाना चालक: परवाना नसतानाही भरधाव गाड्या चालवणाऱ्या चालकांना जागीच दंड ठोठावण्यात आला.

या कारवाईनंतर बोलताना परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी स्पष्ट केले की, “कचरा आणि दूध संकलन करणाऱ्या यंत्रणांनी चालक नेमताना त्यांच्याकडे वैध परवाना असल्याची खात्री करणे बंधनकारक आहे. यापुढे केवळ चालकच नाही, तर त्यांना वाहन उपलब्ध करून देणाऱ्या मालकांवर आणि संबंधित संस्थांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल. भविष्यात ही तपासणी मोहीम अशीच सुरू राहील.”

सामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ‘महाराष्ट्र पोलीस कारनामा’ने अत्यंत प्रभावीपणे मांडला. बातमीतील तथ्यांमुळे प्रशासनाला आपली कार्यपद्धती बदलण्यास भाग पडले. केवळ कार्यालयीन वेळेतच नाही, तर गुन्हेगार आणि नियम मोडणाऱ्यांच्या वेळेनुसार (पहाटे व रात्री) कारवाई करण्याची गरज या बातमीने अधोरेखित केली.व प्रशासकीय पातळीवर बारामती पोलीस व बारामती आरटीओ विभाग यांनी समन्वय साधून याची दखल घेऊन सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. 

‘MPK NEWS’ च्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे बारामतीकरांनी समाधान व्यक्त केले असून, भविष्यातही अशा ‘यमदूतांवर’ प्रशासनाचा वचक राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नागरिकांचे ,जनतेचे एक विश्वासू व्यासपीठ म्हणून आज महाराष्ट्र पोलीस कारनामा MPK NEWS कडे पाहिले जात आहे.

बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व बारामती पोलीस विभाग यांना महाराष्ट्र पोलीस कारनामाच्या वतीने एक विशेष विनंती आहे की बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात यावर विशेष कारवाई करण्यात यावी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे