ब्रेकिंगमहाराष्ट्र
महाराष्ट्र पोलीस दलात अधिकाऱ्यांची उलथापालथ, एकूण ३७० पोलिस निरीक्षकांचा समावेश

0
6
5
2
2
8
बारामती : सध्या महाराष्ट्र पोलिस दलामध्ये बदल्यांचे सत्र सुरू आहे. आस्थापना विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील ३७० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून, राज्यातील ४२९ सहायक पोलिस निरीक्षकांसह ५५६ पोलिस उपनिरीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र पोलिस महासंचालक कार्यालयाच्या आस्थापना विभागाचे अपर पोलिस महासंचालक डॉ. सुखविंदर सिंह यांनी राज्यातील पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांनुसार, ३७० पोलिस निरीक्षक, ४२९ सहायक पोलिस निरीक्षक आणि ५५६ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.





