Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामतीतील ‘त्या’ सराईत गुंडाची रवानगी थेट नागपूर कारागृहात! एमपीडीए अंतर्गत मोठी कारवाई; गुन्हेगारी वर्तुळात खळबळ

0 6 2 7 8 0

बारामती: पुणे ग्रामीण पोलिसांच्या ‘खाकी’चा दरारा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. बारामती शहर आणि परिसरात आपल्या गुन्हेगारी कारवायांनी सामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुंडावर बारामती शहर पोलिसांनी एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्याचा बडगा उगारला आहे. गणेश तुळशीराम पवार (वय ३३, रा. हंबीर बोळ, आमराई, बारामती) असे या गुंडाचे नाव असून, त्याची रवानगी आता थेट नागपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बारामतीतील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

बारामती शहरातील हंबीर बोळ परिसरात राहणारा गणेश पवार हा पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी भांडण तंटा करणे, खुनाचा प्रयत्न करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. केवळ गुन्हे करून तो थांबला नाही, तर त्याने आपल्या वर्तणुकीने बारामती शहर व ग्रामीण भागात सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते. त्याच्या या वाढत्या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. संदिपसिंग गिल यांनी जिल्हाभरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी गणेश पवार याच्या गुन्हेगारी कुंडलीचा अभ्यास करून त्याच्यावर एम.पी.डी.ए. (झोपडप‌ट्टी दादा प्रतिबंधक कायदा) अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला.

हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांच्यामार्फत पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मा. जितेंद्र डुडी यांच्याकडे सादर करण्यात आला. गणेश पवार याच्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याचे निरीक्षण नोंदवत, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश (दि. ६ जानेवारी २०२६ रोजी) दिले.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त होताच बारामती पोलिसांनी वेगाने हालचाली केल्या. आज (दि. ८ जानेवारी २०२६) बारामती शहर पोलिसांच्या पथकाने गणेश पवार याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला पुढील एक वर्षासाठी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

या बाबत आणखी गुंडांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे,

 “पुणे ग्रामीण हद्दीत दहशत माजवणारे, अवैध धंदे करणारे आणि सामान्य लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या गुंडांची गय केली जाणार नाही. गणेश पवार याच्याप्रमाणेच आणखी काही गुंड प्रवृत्तीच्या आणि अवैध धंदे करणाऱ्या लोकांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून, आगामी काळात त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल.”

श्रीशैल चिवडशेट्टी (पोलीस निरीक्षक, बारामती शहर)

ही धडाकेबाज कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, बारामती शहरचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक सतीष राऊत, रत्नदिप भंडारे यांच्यासह पोलीस अंमलदार महेश बनकर (एलसीबी), सागर जामदार, अभिजित कांबळे, सुलतान डांगे, रामचंद्र शिंदे, उदय टापरे, यशवंत पवार, अक्षय सिताप, अमोल देवकाते, विशाल चौधर, पोपट कवितके, वैभव मदने, विशाल शिंदे, गिरीश नेवसे, रईस मुलाणी आणि राहूल बडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे