Breaking
अपघातब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

वडगांव निंबाळकर येथील पुलाच्या संरक्षक भिंत  Retaining wall च्या दगडी पायऱ्या धोकादायक,. अपघात झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग बारामती,घेणार जबाबदारी ?

0 6 3 5 4 1

बारामती: निरा बारामती राज्य मार्गावरील वडगांव निंबाळकर येथील ओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूला Retaining wall संरक्षक भिंती आहेत,बारामती कडून निरेकडे जाताना उजव्या बाजूला त्या पायऱ्या Steps आहेत त्या मध्ये वडगांव निंबाळकर ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर असणारी एक पायरी Steps आहे

व एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ समोरील अशा दोन ठिकाणी पायऱ्या Steps आहेत,

 

 

मध्यंतरी निरा बारामती रोड रूंदीकरण करण्यात आले आहे व या मध्ये रस्त्याची उंची वाढल्याने त्या पायऱ्यांकडे लक्ष न देता त्या आहे त्याच अवस्थेत ठेवण्यात आल्या यामुळे या ठिकाणी एक खड्डा असल्यासारखे तयार झाले आहे.

या परिसरात एखादे वाहन किंवा पादचारी यांना रस्त्याचा अंदाज न आल्यास रात्री किंवा दिवसा रस्त्यावरून जाणारे वाहन खाली जाऊन अपघात होऊ शकतो किंवा कोणी पादचारी येथून जाताना किंवा त्या पायऱ्यांवरून उतरताना देखील अपघात होऊ शकतो, या ठिकाणी समोरच ग्रामपंचायत कार्यालय असल्याने गावकरी काहिना काही कामानिमित्त येथे येत असतात व या ठिकाणी बरेच लोक घसरून पडलेले आहेत असेही लोकांकडून सांगण्यात आले आहे.

याच ठिकाणाहून काही अंतरावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ समोरही अशीच अवस्था आहे या ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा आहे या शाळेत बरेच पालक आपल्या मुलांना शाळेत सोडण्याकरीता येत असतात किंवा काही विद्यार्थी स्वताहून या पायऱ्या Steps चढून किंवा उतरुन शाळेत येत जात असतात, सध्या पावसाळा सुरु आहे या ठिकाणी चढ उतार करताना एखाद्या विद्यार्थ्याचा अपघात होऊ शकतो किंवा त्याला दुखापत होवुन काही इजा होऊ शकते.

वरील शक्यतांचा विचार करता या पायऱ्या पुर्ववत दगडी बांधकाम करून किंवा सिमेंट मध्ये नव्याने बांधून त्याच्या दोन्ही बाजूस रिलींग तयार करून नव्याने करण्यात याव्या अशी स्थानिक पातळीवर मागणी होत आहे.

अन्यथा वर नमुद ठिकाणी अनावधानाने काही घडल्यास याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग बारामती घेणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होणार आहे.

या विषयावर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग बारामती यांच्या संबंधातित अधिकारी यांना विचारणा केली होती त्यांनी यासाठी प्रस्ताव पाठवून निधी मंजूर करून घ्यावा लागेल असे उत्तर दिले होते, आजतागायत यावर काहीही कारवाई किंवा प्रतिक्रिया संबंधित विभागाकडून प्राप्त नाही.

याच बरोबर वडगांव निंबाळकर ढोले वस्ती ते वडगांव पोलीस ठाणे या दरम्यान जेवढे गतीरोधक speed breaker आहेत यावर पांढरे पट्टे मारण्यात यावे यांचे प्रमुख कारण पावसाळ्यात रात्री आणि दिवसाही हे गतीरोधक दिसत नाहीत यामुळे वाहने यावर जोरात आपटली जातात व वाहनांचे नुकसान होते, कदाचित एखाद्या वाहनाचे नियंत्रण सुटून वाहन आजुबाजुला जाऊन मोठा अपघात होऊ शकतो.

संबंधित प्रशासनाने यावर योग्य ती दखल घ्यावी अन्यथा होणाऱ्या अपघातांना तेच प्रशासन जबाबदार आहे असे गृहीत धरले जाईल अशी जनभावना आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे