Breaking
अपघातब्रेकिंगमहाराष्ट्र

कोऱ्हाळे बुद्रुक येथे विजेचा धक्का बसुन मृत्यू

0 5 9 3 4 2

बारामती: कोऱ्हाळे बुद्रुक ता. बारामती येथे दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या विहिरीवरील विद्युत मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या निलेश सोपान अडागळे रा,कोऱ्हाळे बुद्रुक या 34 वर्षीय तरुणाचा विद्युत धक्का बसुन मृत्यू झाल्याची घटना घडली.

निलेश हे शेतामधील विद्युत पंप बंद करण्यासाठी गेले असता विद्युत मीटर संचातील बटन बंद करत असताना धक्का बसून ही घटना घडली असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली.

निलेश अडागळे यांच्या पश्चात पत्नी शितल, मुलगी अदिती वय 10 वर्षे व मुलगा अर्णव वय 7 वर्षे असा परिवार आहे. 

निलेश यांचे वडील सोपान अडागळे हे निवृत्त एसटी कंडक्टर आहेत. त्यांचे कुटुंब हे वारकरी संप्रदायाशी जोडलेले आहे,हरिभक्त परायण किर्तनकार गणेश सोपान अडागळे हे निलेश यांचे बंधू आहेत. निलेश अडागळे हे 

कोऱ्हाळे बुद्रुक येथील नवजीवन तरूण मंडळाचे  संस्थापक अध्यक्ष होते, युवकांमध्ये “अध्यक्ष” या टोपन नावाने ते अत्यंत लोकप्रिय,प्रेमळ व मन मिळावू व्यक्तिमत्त्व होते असे त्यांच्या चाहत्यांनी व जवळच्या व्यक्तींकडून सांगण्यात आले.

त्यांच्या अकस्मात जाण्याने संपूर्ण कोऱ्हाळे बुद्रुक व पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे