अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची जबाबदारी श्री.मंगेश चिवटे यांच्याकडेच रहावी.
मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची संपूर्ण जबाबदारी हि श्री मंगेश चिवटे यांच्याकडेच रहावी अशी महाराष्ट्रातील गोरगरीब गरजु जनतेची मागणी आहे.व या मागणीसाठी राज्यातून प्रतिक्रिया येत आहेत.

0
7
0
4
2
5
बारामती: महाविकास आघाडी सरकारच्या काळात अगदी मृत अवस्थेत पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला जीवनदान देण्याचे कार्य कोणी असेल तर ते श्री मंगेश चिवटे यांनी केले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात पहिल्या दिवसापासून जनमानसात प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे वैद्यकीय मदत कक्षाचे कार्य पोहचविण्याचे काम जर कोणी असेल तर ते श्री मंगेश चिवटे यांनी केले आहे.श्री.एकनाथ शिंदे यांचा कार्यकाळात अवघ्या २.५ वर्षांच्या सरकारमध्ये ३६० कोटी पेक्षा जास्त वैद्यकीय निधी गोरगरीब गरजू रुग्णांना मिळवून देवून जगभरात एक आदर्श उभा करणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री.मंगेश चिवटे.

आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची ओळख किंवा वैद्यकीय मदत कक्ष जर माहीत असेल तर तो फक्त श्री मंगेश चिवटे यांच्यामुळेच पूर्ण महाराष्ट्राला माहीत झाला आहे.

कोणतीही जात-धर्म-पंथ न पाहता किंवा कोणताही पक्ष न पाहता या व्यक्तीने हजारो शेकडो रुग्णांना वैद्यकीय निधी मिळवून देण्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता, स्वतः ची तब्येत ठीक नसताना उपचार सुरू असताना स्वतःच्या आरोग्याचा स्वतःच्या तब्येतीचा विचार न करता मग ते चालू वाहनात सलाईन लावणे सलाईन संपले की मंत्रालयात येवून आपल्या जबाबदारीचे आपल्या कर्तव्याचे पालन करीत असत मग रात्री कितीही वाजले तरी त्याचा विचार न करता आपली जबाबदारी आणि आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर राहुन आपले कार्य पूर्ण करत असत. तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या कामकाजात कितीही व्यस्त असले तरीही कोणाच्यातरी जीवाचा प्रश्न असेल तर स्वतः तात्कालीन मुख्यमंत्री यांची भेट घेऊन, पत्र घेऊन,शिफारस घेऊन त्या व्यक्तीच्या जीवासाठी प्रयत्न करणारे एकच नाव मंगेश चिवटे.




