Breaking
अभिव्यक्तीमहाराष्ट्रसामाजिक

रोहित(नाना)आत्माराम बनकर यांची ‘संतभूमी संरक्षण समिती’च्या प्रधान समिती विश्वस्तपदी नियुक्ती.

0 5 9 3 4 9

बारामती/पुणे: जगद्गुरु संत तुकाराम महाराज साक्षात्कार भूमी सेवा न्यास संचलित, ‘संतभूमी संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य’ या संस्थेच्या प्रधान समिती विश्वस्तपदी माननीय श्री. नाना (रोहित) आत्माराम बनकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुकयाभक्त मधुसूदन महाराज यांच्या हस्ते त्यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नाना बनकर यांची सामाजिक क्षेत्रातील आवड आणि त्यांनी आजवर केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

भामचंद्र डोंगराच्या संवर्धनासाठी महत्त्वाची जबाबदारी

भंडारा डोंगर आणि घोरवडी डोंगर यांसारखी संत तुकोबारायांच्या ध्यान-चिंतनाने पावन झालेली स्थळे, तसेच विठ्ठलाच्या सगुण-निर्गुण रूपाचा जिथे साक्षात्कार झाला, ती तपोभूमी भामचंद्र डोंगर संरक्षित करण्यासाठी समितीने मोठे आंदोलन उभारले आहे. या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी आणि संतभूमीच्या न्याय हक्कासाठी नाना बनकर आता ‘प्रधान समिती विश्वस्त’ म्हणून कार्य पाहणार आहेत.

आपल्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करताना नाना बनकर म्हणाले की, “जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची ही एक मोठी संधी मला मिळाली आहे. संतपरंपरा जपण्यासाठी आणि संतभूमीच्या संवर्धनासाठी मी पूर्ण निष्ठेने प्रयत्न करेन. मला ही संधी दिल्याबद्दल मी सर्व वारकरी संप्रदायाचे आणि समितीचे मनापासून आभार मानतो.”

समितीच्या सर्व नियम व नियमावलीचे पालन करून, समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांच्या आधारे ते आपले कार्य पुढे नेतील, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे