Breaking
अपघातब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

बारामती आगारात ‘चालक दिन’ व ‘राष्ट्रीय प्रवासी दिन’ उत्साहात संपन्न; सुरक्षित वाहतुकीसाठी पथनाट्यातून जनजागृती

0 5 9 3 3 9

बारामती : बारामती एस.टी. आगार, प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) बारामती आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती आगारात ‘रथसप्तमी प्रवासी दिन’ व ‘चालक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सुरक्षित वाहतुकीचा संदेश देत विनाअपघात सेवा देणाऱ्या चालकांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी विभागीय यंत्र अभियंता (चा.) पांडुरंग वाघमोडे, आगार व्यवस्थापक रविराज घोगरे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे बारामती तालुका अध्यक्ष संजीव बोराटे, उपाध्यक्ष प्रशांत जगताप, बारामती बस स्थानक प्रमुख घनश्याम शिंदे आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सुरज पाटील आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

एस.टी. महामंडळाच्या सेवेत राहून प्रवाशांना सुरक्षित आणि विनाअपघात सेवा देणाऱ्या चालकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक व गुलाबपुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच प्रवासी दिनाचे औचित्य साधून चालक, वाहक आणि प्रवाशांचे गुलाबपुष्प व पाणी देऊन स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, आगारातील सफाईगार श्री. दिलीप सरोदे यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन विशेष सत्कार करण्यात आला, ज्यामुळे त्यांच्या कष्टाची दखल घेतली गेली.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य. विद्यार्थ्यांनी “जागरूक ग्राहक बनूया, वाहतुकीचे नियम पाळूया” या विषयावर आधारित उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधले आणि रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती केली.

यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री. सुरज पाटील यांनी प्रवासादरम्यान वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, तसेच अतिवेग व बेदरकार वाहन चालवणे टाळण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी शासनाच्या ‘राहवीर योजने’ची माहितीही उपस्थितांना दिली.

दरम्यान, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संजीव बोराटे व महेश पवार यांनी प्रवाशांचे हक्क, सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे स्वरूप आणि ग्राहक संरक्षण कायदा यावर सविस्तर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या शेवटी विभागीय यंत्र अभियंता पांडुरंग वाघमोडे व आगार व्यवस्थापक रविराज घोगरे यांनी स्थानकातील सुरक्षा व्यवस्था, उपलब्ध सुविधा आणि बस वाहतुकीच्या नियोजनाबाबत माहिती दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे