अपघातब्रेकिंगमहाराष्ट्र
सावधान! ट्रिपल सीट प्रवास पडू शकतो महाग; पुणे पोलिसांची धडक मोहीम सुरू. १,४५४ ट्रिपल सीट वाहनांवर मोठी कारवाई. एकाच मोहिमेत १६ लाखांचा दंड वसूल;

0
6
0
7
4
7

पुणे : पुणे शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी ‘ट्रिपल सीट’ दुचाकीस्वारांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे.पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरात राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत हजारो वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, लाखो रुपयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला आहे.

एका नजरेत कारवाईचा तपशील
वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्ते, गजबजलेले चौक आणि गर्दीच्या ठिकाणी सापळा लावून ही मोहीम राबवली. या कारवाईची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

वरील कारवाई साठी पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटा मैदानात तैनात करण्यात आला होता.

या मोहिमेचे नियोजन अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यामध्ये पुणे शहर वाहतूक विभागातील ३० वाहतूक विभाग आणि ४४ पोलीस स्टेशन मधील अधिकारी व अंमलदारांनी सक्रिय सहभाग नोंदवला. रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने ही आतापर्यंतची मोठी कारवाई मानली जात आहे.




