Breaking
अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

“साई सेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वाघळवाडी ता.बारामती” यांच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त शिबिराचे आयोजन

0 5 5 5 4 1

बारामती : राज्याचे मा.उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार
यांच्या वाढदिवसानिमित्त “साई सेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲन्ड आई.सी.यु.वाघळवाडी ता.बारामती” येथे
शुक्रवार दि.११/०७/२०२५ पासुन ते मंगळवार दि.१५/०८/२०२५ सकाळी १० ते २ या वेळेत “मोफत भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन” करण्यात आले आहे.

या शिबीरातील विविध आजारांवर मोफत वैद्यकीय सेवा तसेच मोफत बाल हृदयरोग शिबीर शुक्रवार दि.११/०७/२०२५ रोजी असेल,या मध्ये विशेषज्ञांचा सल्ला तसेच मोफत ईसीजी मोफत 2D इकोकार्डियोग्राफी करण्यात येणार आहे.
ज्या बालकांना जन्मजात हृदयाचे आजार तसेच लहान बालकांच्या ह्रदयास छिद्र असल्यास मोफत वैद्यकीय उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.

“विश्वराज हॉस्पिटल लोणीकाळभोर” येथील प्रसिद्ध डॉ.आशिष बनपुरकर MBBS MD (Paeds) DNB (Paediatric Cardiology) बालरोग तज्ञ हे शिबीरातील तज्ञ डॉक्टर उपस्थित रहाणार आहेत.

या दरम्यान ह्रदय रोग तसेच हृदयाला छिद्र असलेल्या रुग्णांना मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
विश्वराज हॉस्पिटल आणि साईसेवा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीरात सर्व प्रकारच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत
तसेच मोफत डायबिटीस मार्गदर्शन व उपचार आणि मोफत अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे.याच बरोबर मुतखडा व प्रोटेस्ट ग्रंथी ऑपरेशन (गरजु रुग्णांकरिता) करण्यात येणार असल्याचे डॉ.विद्यानंद भिलारे यांनी सांगितले आहे.

शिबिरासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ.विद्यानंद भिलारे MD Medicine, चेअरमन साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ॲन्ड आय.सी.यु.आणि डॉ. राहुल शिंगटे
मॅनेजिंग डायरेक्टर साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे असणार आहेत.

शिबीरासाठी नावनोंदणी आवश्यक व पुर्वीचे सर्व रिपोर्ट बरोबर आणावेत.
उपलब्ध सर्व शासकिय योजना त्यात आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना मुख्यमंत्री सहायता योजना प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या योजना राबविण्यात येतील.
योजनेकरीता आवश्यक कागदपत्रे आधारकार्ड, रेशन कार्ड तसेच आयुष्यमान कार्ड व  उत्पनाचा दाखला (तहसिलदार) आवश्यक असेल.

शिबीराचे ठिकाण:

साई सेवा मल्टिस्पेशालिटी ॲन्ड आई.सी.यु. वाघळवाडी ता. बारामती जिल्हा.पुणे

अधिक माहिती व नावनोंदणी करीता खालील क्रमांकावर 9750871008 वर संपर्क साधावा असे साईसेवा हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे