Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

प्रेयसीच्या पतीचा ‘गेम’ वाजवणारा प्रियकर गजाआड; जेजुरी पोलिसांची २४ तासांत धडाकेबाज कामगिरी

0 6 0 7 5 1

जेजुरी : “तिच्याशी लग्न मला करायचे होते, तू का केलेस?” या रागातून एका नवविवाहित तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे घडली आहे. डोक्यात कोयत्याने वार करून पसार झालेल्या मुख्य आरोपीला जेजुरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या खुनाच्या थरारामुळे संपूर्ण माळशिरस परिसर हादरला आहे.

राजेवाडी (ता. पुरंदर) येथील दीपक जगताप यांचा केवळ महिनाभरापूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र, हा विवाह आरोपी सुशांत संदीप मापारी (वय २१) याच्या डोळ्यात खुपत होता. सुशांतचे संबंधित तरुणीवर प्रेम होते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. “तू तिच्याशी लग्न केलेस, आता तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकीच सुशांतने दीपक यांना फोनवरून दिली होती. आणि दुर्दैवाने, ही धमकी त्याने खरी करून दाखवली.

१३ डिसेंबरचा दिवस. सुशांतने काटा काढण्याचा पक्का प्लॅन केला. त्याने दीपक जगताप यांना माळशिरस येथील निर्जन रामकाठी शिवारात बोलावून घेतले. तिथे संधी मिळताच, सुशांतने दीपक यांच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात दीपक यांना सोडून आरोपीने तिथून पोबारा केला. रविवार, १४ डिसेंबर रोजी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांची चक्रे वेगाने फिरली.

खुनानंतर आरोपी पसार झाला होता, मात्र जेजुरी पोलीस त्याच्या मागावर होते. सोमवारी पोलिसांना गोपनीय खबर मिळाली की आरोपी यवत परिसरात लपला आहे. क्षणाचाही विलंब न लावता सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यवत गाठले. आरोपी एका शेतात लपून बसला होता. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला शिताफीने घेरले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या.

पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. या खुनाच्या कटात सुशांतसोबत एका अल्पवयीन मुलाचा (विधीसंघर्षित बालक) देखील सहभाग असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीसह या बालकालाही ताब्यात घेतले आहे. आरोपी सुशांतने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

गुन्ह्यातील मुख्य आरोपी: सुशांत संदीप मापारी (वय २१, मूळ रा. पिंपळगाव, ता. दौंड. सध्या रा. माळशिरस.

व त्याचा सहकारी आरोपी सार्थक तानाजी तासकर (विधीसंघर्षित बालक,) रा. पोंढे, ता. पुरंदर. यांना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, महेश पाटील, हवालदार अण्णा देशमुख, तात्यासाहेब खाडे, विठ्ठल कदम, दशरथ बनसोडे, संदीप भापकर, हेमंत भोंगळे, योगेश चीतारे आणि प्रसाद कोळेकर यांच्या पथकाने केली. पुढील तपास जेजुरी पोलीस करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे